Assembly Session News : महाराष्ट्रात विशेषतः मराठवाड्यातील बीड, परभणी, धाराशीव, लातूरसह अनेक जिल्ह्यात पवनचक्की कंपनी आणि शेतकऱ्यांमध्ये वादाचे प्रकार घडत आहेत. बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या देखील पवनचक्की कंपनीकडून खंडणीच्या प्रकरणातूनच झाल्याचे समोर आले होते.
या पवनचक्की कंपन्यांकडून शेतकऱ्यांना मारहाण केली जात असल्याचा मुद्दा काँग्रेसचे आमदार अमित देशमुख (Amit Deshmukh) यांनी सभागृहात मांडला. शेतकऱ्यांना मारहाण करणाऱ्यांना पोलीस पाठीशी घालत असल्याचा आरोपही त्यांनी केला. पवनचक्की बसवणाऱ्या कंपनीकडून महाराष्ट्रात शेतकऱ्यांची अडवणूक होतेय, पिळवणूक होतय, त्यांना मारहाण होतेय, जे हे सर्व करतायेत त्यांना पोलीस अधिकारी पाठीशी घालतायेत.
यासंबंधी कुठलीच माहिती शासनाकडे उपलब्ध नाही ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था शिल्लक राहिली आहे काय? असा प्रश्न अमित देशमुख यांनी विधानसभेत उपस्थित केला. (Congress) महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सध्या मुंबई येथे सुरू आहे, पवनचक्की बसवणाऱ्या कंपनीकडून धाराशिव जिल्ह्यात शेतकऱ्यांना मारहाण होत असून, पोलीस अधिकारीही शेतकऱ्याऐवजी कंपनीच्या लोकांना पाठीशी घालत असल्याची चर्चा आहे.
शासनाकडे मात्र यासंबंधी कसलीच माहिती उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले. पवनचक्की कंपनीचे लोक शेतकऱ्यांना मारहाण करीत असतील, पोलीस अधिकारी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देत नसतील तर महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती बिकट आहे हे स्पष्ट होत आहे . त्यामुळे शेतकरी आणि सामान्य माणसाला राज्यात कसे जगावे असा प्रश्न पडला आहे.
धाराशिव जिल्ह्यात कोणत्या कंपनीच्या लोकांनी शेतकऱ्यांना मारहाण केली, ज्या शेतकऱ्यांना मारहाण झाली त्यांचे नाव आणि ज्या पोलिस अधिकाऱ्याने शेतकऱ्याला न्याय मिळवून दिला नाही त्या अधिकाऱ्याची माहिती संबंधित विभागाच्या मंत्र्यांनी सभागृहात सादर करावी अशी मागणीही अमित देशमुख यांनी केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.