Ambadas Danve-Abdul Sattar News, Aurangabad Sarkarnama
मराठवाडा

Winter Session : अब्दुल सत्तारांची एक नाही, अशी पाच प्रकरणे ; त्यांचा राजीनामा घ्याच..

Shivsena : औरंगाबाद खंडपीठाने देखील सत्तार यांना फटकारले होते याचा उल्लेख देखील दानवे यांनी केला.

सरकारनामा ब्युरो

Ambadas Danve : नागपूर खंडपीठाने गायरान जमीन वाटपावरून ओढलेले ताशेरे आणि कृषी महोत्सवासाठीच्या वसुलीवरून महाविकास आघाडीने कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांना चांगलेच घेरले आहे. विधान परिषदेत विरोधी पक्षनेते यांनी देखील २८९ च्या सूचनेवर निवदेन करतांना सत्तार यांचे एक नाही तर राज्यात अशी पाच प्रकरणे सुरू असल्याचा आरोप केला.

न्यायलायाच्या आदेशांचे वारंवार उल्लंघन करत सत्तारांनी जमीन वाटपाचे अनेक घोटाळे केले आहेत. (Shivsena) अशा मंत्र्यांचा राजीनामा घेतलाच पाहिजे, अशी मागणी करत ३५ ची सूचना स्वीकारून या गंभीर विषयावर सभागृहात चर्चा करा, अशी मागणी देखील दानवे यांनी केली. त्याला अॅड. अनिल परब (Anil Parab) यांनी देखील दुजोरा दिला.

कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या विभागाकडून त्यांच्या सिल्लोड मतदारसंघात १ जानेवारीपासून राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवासाठी १५ कोटी वसुल करण्याचे टार्गेट संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना दिल्याचा आरोप, प्रवेशिका वाटून पैसे गोळा करण्याचे प्रकरण दोन्ही सभागृहात गाजले.

विधानसभेत अजित पवार तर विधान परिषदेत अंबादास दानवे यांनी या विषयावर आक्रमक भूमिका घेतली. दानवे यांनी विधान परिषदेत, नागपूर खंडपीठाच्या गायरान जमीन वाटपा संदर्भातील स्थिगितीचा दाखला देत अब्दुल सत्तारांच्या राज्यातील इतर जमीन वाटप प्रकरणांची जंत्रीच मांडली.

रत्नागिरी, औरंगाबाद, नागपूर अशा अनेक ठिकाणी सत्तार यांनी न्यायालयाचे आदेश डावलून मनमानी पद्धतीने भूखंड, वाळूचे ठेके, कृषी उत्पन्न बाजार समितीची जमीन आपल्या अधिकार कक्षात नसतांना विकल्याचा किंवा वाटप केल्याचा आरोप केला. या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने देखील सत्तार यांना फटकारले होते याचा उल्लेख देखील दानवे यांनी केला. अशा मंत्र्यांचा राजीनामा तात्काळ घेतला पाहिजे, तसेच सभागृहात यावर चर्चा झाली पाहिजे, असेही दानवे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT