Winter Session : गायरान जमीन, कृषी महोत्सव प्रकरणावरून सत्तारांच्या राजीनाम्यासाठी अजित पवार मैदानात..

Ajit Pawar : कृषी महोत्सव साॅल्लीड व्हावा, म्हणून कृषी खात्याला वेठीस धरणे चुकीचे आहे.
Ajit Pawar-Abdul Sattar News, Aurangabad
Ajit Pawar-Abdul Sattar News, AurangabadSarkarnama

Ajit Pawar On Sattar News : राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. (Nagpur) नागपूर खंडपीठाने गायरान जमीनीच्या वाटप प्रकरणात ताशेरे ओढलेले असतांनाच मतदारसंघातील कृषी महोत्सवासाठी १५ कोटींच्या वसुलीच्या आरोपांनी सत्तार अडचणीत आले आहेत. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हा मुद्दा विधानभेत उपस्थितीत करत सत्तारांच्या राजीनाम्याची मागणी केली.

Ajit Pawar-Abdul Sattar News, Aurangabad
पवारांच्या फोननंतर अजितदादा आक्रमक : सत्तारांचा राजीनामा मागत फडणवीसांवर केला हल्लाबोल...

काही महिन्यांपुर्वी अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल शिवराळ भाषेत टीका केली होती. त्यानंतर संपुर्ण राज्यात राष्ट्रवादी काॅंग्रेसने आक्रमक होत आंदोलन केले होते. सत्तारांच्या राजीनाम्यासाठी सरकारवर दबाव वाढवला होता. परंतु या सगळ्या गोंधळात अजित पवार (Ajit Pawar) मात्र गप्प होते, या वादावर त्यांनी प्रतिक्रिया का दिली नाही? अशी चर्चा देखील राजकीय वर्तुळात तेव्हा करण्यात आली होती.

परंतु एखाद्या नेत्याचा करेक्ट कार्यक्रम करायचा असेल तर त्याला टप्यात येवू द्यावे लागते, तसेच काहीसे धोरण अजित पवारांनी सत्तारांच्या बाबतीत स्वीकारले होते की काय? असे आता म्हणावे लागेल. अब्दुल सत्तार यांनी कृषीमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाज मराठवाड्यात आणि तेही आपल्या सिल्लोड मतदारसंघात राज्यस्तरीय कृषी महोत्सव खेचून आणला. त्यासाठी संपुर्ण यंत्रणा कामाला लावली, पण आता त्यांचा हा अट्टाहास कशासाठी होता? यावरून टीका आणि आरोप होवू लागले आहेत.

कृषी महोत्सवासाठी १५ कोटी वसुल करण्याचे टार्गेट संबंधित विभागाला देण्यात आल्याचे आरोप झाले आणि सत्तार पुन्हा चर्चेत आले. या संदर्भात प्रकाशित झालेल्या वृत्ताचा आणि पुराव्यांचा दाखला देत अजित पवारांनी विधानसभेत हा मुद्दा उपस्थीत केला. अजित पवार म्हणाले, कृषी महोत्सव कार्यक्रम १५-३० कोटी सिल्लोड घ्यायचं म्हणून पैसे गोळा करत आहेत. मीडियामध्ये तशी बातमी आली आहे.

१० पेक्षा जास्त तालुके ज्या जिल्ह्यात आहेत त्यांनी २५ हजार द्यायचे, ३० पत्रिका खपावायच्या, अशा विविध पत्रिका खापवयच्या. जिथे तालुके कमी तिथे कमी पत्रिका खपवा, अशा सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्याची माहिती आहे. बरं या प्रवेशिकांवर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे फोटोही टाकले. कृषी महोत्सवात अजय- अतुल नाईटसचेही आयोजन करण्यात आले आहे.

आता अजय-अतुल कार्यक्रमासाठी किती कोटी घेतात हे सगळ्यांना माहित आहे. सुनील ग्रोव्हर, मग फु बाई फू, मग इंदोरीकर महाराज,चला हवा येऊ द्या, हस्य जत्रा अशा कार्यक्रमांना कोरोड रुपये लागतात. असे कार्यक्रम राज्याचे होवू शकतात का?

Ajit Pawar-Abdul Sattar News, Aurangabad
Uddhav Thackeray : 'तर कोकणातले 100 सांगाडे ‘पुरावे’ म्हणून SIT समोर स्वतःच हजर होतील'

त्यासाठी वसुली केली जात आहे, याबद्दल जनतेमध्ये नाराजी आहे. कृषी महोत्सव साॅल्लीड व्हावा, म्हणून कृषी खात्याला वेठीस धरणे चुकीचे आहे. आमच्या काळात दादा भुसेंनी देखील कृषी महोत्सव घेतला होता, पण त्यासाठी आम्ही तरतूद केली होती. अशा प्रकारे कोट्यावधी रुपयांच्या वसुलीचे टार्गेट दिले नव्हते. ही गंभीर बाब असून हा भ्रष्टाचार नाही का? याचा विचार सरकारने केला पाहिजे आणि तात्काळ कृषीमंत्र्यांचा राजनामा घेतला पाहिजे, अशी मागणी देखील अजित पवारांनी सभागृहात केली.

नागपूर खंडपीठाने अब्दुल सत्तार महसुल राज्यमंत्री असतांना केलेल्या गायरान जमीन वाटपावर देखील नाराजी व्यक्त करत त्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. यावर देखील अजित पवार यांनी काही मुद्दे उपस्थितीत केले. नागपूर खंडपीठाने आताच्या कृषीमंत्र्यांविरोधात ताशेरे ओढले आहेत. पदाचा दुरुपयोग केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. २९ गुंठे गायरान जमीन वाटपात १५० कोटींचा घोटाळा झाल्याचे कोर्टाने निरीक्षण नोंदवले आहे.

Ajit Pawar-Abdul Sattar News, Aurangabad
Sharad Pawar news : सुषमा अंधारेंच्या वक्तव्यानंतर शरद पवारांची वारकऱ्यांशी चर्चा

महसूल राज्य मंत्री असताना निर्णया बाबत जून महिन्यात ठाकरे सरकार जाणार की राहणार अशी परिस्थिती असताना गायरान जमीन वाटपाचा निर्णय घेतला गेला. तो चुकीचा निर्णय आहे हे जिल्हाधिकारी यांनी महसूल खात्याला सांगितले होते. निर्णय झाला तर कोर्टाचा अवमान होईल हे निदर्शनास आणून दिले होते. तरी पदाचा दुरूपयोग करत एका व्यक्तीला फायदा मिळवून दिला, असेही अजित पवार यांनी सभागृहात सांगितले. तेव्हा अब्दुल सत्तार यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला पाहिजे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी त्यांची हाकालपट्टी करावी, अशी मागणी देखील सत्तार यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com