Banner In Aurangabad Sarkarnama
मराठवाडा

महापालिका निवडणूक लढवण्यासाठी बायको हवी ; औरंगाबादेत लागले बॅनर

वय वर्ष २५ ते ४० अविवाहीत, विधवा, घटस्फोटित चालेल. फक्त २ पेक्षा जास्त अपत्ये असणारी चालणार नाही, असे या बॅनरवर स्पष्ट करण्यात आले आहे. (Aurangabad District)

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : कोण कधी काय करेल याचा नेमचं नाही. राजकारणाने तर भल्याभल्यांना सत्ता आणि झटपट श्रीमंत होण्याची भूरळ घातल्याने गल्लोगल्ली भाऊ, दादा आणि भावी नगरसेवक, आमदार पहायला मिळतात. (Aurangabad) मग अशा आपल्या आयडाॅलला शुभेच्छा देणारे बॅनर देखील गल्लीबोळात लावली जातात. (Marathwada) पण सध्या एका अनोख्या बॅनरची चर्चा सुरू आहे.

महापालिका निवडणुक (Municipal Coroprtion Election) लढवता यावी म्हणून आधाची विवाहित आणि तीन आपत्य असलेल्या एका महाशयाने केवळ निवडणूक लढता यावी म्हणून, बायको हवी, असे बॅनर तेही शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या गुलमंडीवर लावले आहे. औरंगाबाद शहरातील गुलमंडी हा भाग शहराचे हदयस्थान म्हणून ओळखले जाते.

अनेक राजकीय पक्षांचा केंद्रबिंदू म्हणून देखील गुलमंडीकडे पाहिले जाते. त्यामुळे सदैव वर्दळ असलेल्या या भागात लावलेले `निवडणूक लढण्यासाठी बायको पाहिजे` हे बॅनर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. रमेश पाटील नावाच्या व्यक्तीने हे बॅनर लावले आहे.

महापालिका निवडणूक लढवण्याची इच्छा बाळगून राजकारणात उतरण्याच्या तयारीत असलेल्या या महाशयाचे लग्न झालेले असून त्यांना आधी दोन आपत्ये होती. लाॅकडाऊनमध्ये एक मुलगी झाल्यामुळे आता मला तीन आपत्ये आहेत. त्यामुळे मला निवडणूक लढवता येत नाही. परंतु आपल्या घरातील कुणीतरी राजकारणात असावे, अशी माझी प्रबळ इच्छा आहे.

त्यामुळे मी लग्नासाठी बायको शोधतो आहे, जेणेकरून तिच्याशी लग्न करून तिलाच निवडणूकीत उतरवून निवडून आणण्याचा आपला मानस असल्याचेही हे पाटील सांगतात. यासाठी जातीची कोणतीही अट नाही.

वय वर्ष २५ ते ४० अविवाहीत, विधवा, घटस्फोटित चालेल. फक्त २ पेक्षा जास्त अपत्ये असणारी चालणार नाही, असे या बॅनरवर स्पष्ट करण्यात आले आहे. संपर्कासाठी क्रमांक देखील टाकण्यात आला आहे, आता या गृहस्थाला बायको मिळते का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT