Abdul Sattar- Raosaheb Danve  Sarkarnama
मराठवाडा

Abdul Sattar Vs Raosaheb Danve : लोकसभेचा पंगा विधानसभेला महागात पडणार, दानवे सत्तारांचा वचपा काढणार?

Abdul Sattar Sillod-Soigaon Assembly Constituency : नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या जालना मतदारंसघात राज्याचे अल्पसंख्याक विकास व पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी महायुती असतांना रावसाहेब दानवे यांना मदत केली नाही.

Jagdish Pansare

Chhatrapati Sambhajinagar News, 12 June : नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या जालना मतदारंसघात राज्याचे अल्पसंख्याक विकास व पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी महायुती असतांना रावसाहेब दानवे यांना मदत केली नाही.

महाविकास आघाडीचे कल्याण काळे यांचे काम करण्याच्या सूचना सत्तारांनी आपल्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना दिल्या होत्या. त्यामुळे सिल्लोड-सोयगांव या सत्तारांच्या मतदारसंघातून दानवे पिछाडीवर गेले आणि तिथे काळेंना मताधिक्य मिळाले.

यापुर्वी दानवेंच्या विजयात सत्तार यांचा महत्वाचा रोल असायचा, यावेळी त्यांच्या पराभवात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली. पाच टर्म सलग निवडून आलेल्या रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांच्या विजयाचा षटकार हुकल्याने ते पलटवार करण्याच्या तयारीत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने ती त्यांना मिळणार आहे. अब्दुल सत्तार यांनी रावसाहेब दानवे यांच्या शेपटीवर पाय दिल्याने त्यांना करारा जवाब मिळणार हे स्पष्टच आहे.

त्याआधीच सावधगिरी बाळगत अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी विधानसभेची जोरदार तयारी सुरू केली आहे. मतदारसंघातील प्रत्येक गाव, वाडी, वस्ती, तांडे एवढेच नाही तर धार्मिक स्थळांना भेटीगाठी देत भरघोस निधीची घोषणा करत सत्तारांनी सोशल इंजिनिअरिंग सुरु केलं आहे. सलग तीनवेळा अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड-सोयगाव मतदारसंघातून विजय मिळवला आहे.

शिवाय नगर परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत अशा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्तारांचे वर्चस्व आहे. मतदारसंघात मजबूत बांधणी हे सत्तारांचे बलस्थान समजले जाते. या जोरावरच ते कोणत्याही पक्षाला आपल्याला हवं तसं झुकवतात. सत्ता तिथे सत्तार हे समीकरण त्यामुळेच त्यांच्याबातीत आतापर्यंत दिसून आलं आहे.

रावसाहेब दानवे आणि अब्दुल सत्तार यांची पडद्यामागची राजकीय मैत्री लपून राहिलेली नाही. गेल्या 25-30 वर्षांपासून या दोन्ही नेत्यांनी एकमेकांना अशी पूरक भूमिका घेत मदत केली. यावेळच्या लोकसभा निवडणुकीत मात्र त्यांच्या मैत्रीत 'दरार' आली. यातून लोकसभेला रावसाहेब दानवेंचा पराभव झाला.

तर महाविकास आघाडीच्या कल्याण काळेंना आपण मदत केल्याची जाहीर कबुली देत सत्तार यांनी रावसाहेब दानवेंना डिवचलं. त्यामुळे आता दानवेदेखील योग्य संधीची वाट पाहत आहेत. मी जर मैदानात उतरलो तर सत्तारांची झाकी उतरवून टाकेल, अशा इशारा दानवे यांनी याआधीच दिला आहे. त्यामुळे सत्तार यांना येणारी विधानसभा निवडणुक सोपी असणार नाही, एवढे मात्र निश्चित.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT