Opposition Leader Ambadas Danve-Cm Eknath Shinde News Sarkarnama
मराठवाडा

Amadas Danve On Cm Shinde : आरोप झालेल्या मंत्र्याला बाळासाहेबांनी पायरी तरी चढू दिली असती का ? तुम्ही पहिल्या रांगेत बसवले...

Marathwada : कारण त्यांना तुम्ही आणि महाशक्तीच्या लोकांनी अभय दिलेले दिसते.

सरकारनामा ब्युरो

Shivsena (UT) : शिवसेनेच्या वर्धापनदिना निमित्त काल मुंबईत दोन सभा झाल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांनी या सभांमधून एकमेकांवर चांगलेच तोंडसुख घेतले. (Amadas Danve On Cm Shinde) या सभेची राजकीय वर्तुळात चर्चा होत असतांना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चक्कार शब्द न काढणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर टीका केली.

कृषी खात्याला आपले बटीक समजणाऱ्या मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांना पहिल्या रांगेत बसवल्यावरून देखील दानवे यांनी शिंदे यांच्यावर निशाणा साधला. अंबादास दानवे, यांनी ट्विट करत मुख्यमंत्र्यावर (Eknath Shinde) टीकेचे बाण सोडले आहेत. काल मी देशाच्या कापूस निर्यात धोरणावर बोललो, चढ्या भावाने विकल्या जाणाऱ्या खातंबाबत, बियाण्यांबाबाबत बोललो.

त्यावर मुख्यमंत्री शब्दाने बोलले नाहीत. (Shivsena) कारण त्यांच्याकडे या प्रश्नांची उत्तरेच नाहीत. शेतकऱ्यांची मदत दुप्पट केली म्हणता, पण महाराष्ट्रात बियाणे-खते दुप्पट, तिप्पट भावाने विकली जात आहेत, त्याच्या खिशाला दुप्पट कात्री लागते आहे, हे उघड सत्य आहे.

कृषीखात्याला खुलेआम आपले बटीक समजणाऱ्या कृषी मंत्र्यांना तुम्ही पहिल्या रांगेत बसवले. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असते तर या मंत्र्याला इतके आरोप झाल्यावर व्यासपीठाची पायरी तरी त्यांनी चढू दिली असती का? पण ते शरम न बाळगता पायऱ्या चढले. कारण त्यांना तुम्ही आणि महाशक्तीच्या लोकांनी अभय दिलेले दिसते, अशी टीका दानवे यांनी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT