Shivsena Vardhapan Din : शिवसेनेच्या वर्धापनदिनी ठाकरे गटाचे शहरप्रमुख आषाढी वारीत, तर शिंदे सेनेचे मुंबईत!

Pimpri Chinchwad News : शिवसेनेचा वर्धापनदिन पिंपरी-चिंचवडमध्ये साजरा झाला सोशल मिडियात,तर मावळात लोणावळ्याच्या पर्यटनस्थळाची स्वच्छता करून
Shivsena Vardhapan Din  Eknath Shinde : Uddhav Thackeray
Shivsena Vardhapan Din Eknath Shinde : Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Pipmri Chinchwad News : यावर्षाचा अपवाद वगळता आतापर्यंत गेली ५६ वर्षे शिवसेनेचा (Shivsena Vardhapan Din) वाढदिवस हा एकाच दिवशी म्हणजे १९ जून रोजी एकदाच साजरा होत होता. त्यानिमित्त मुंबईत एकाच ठिकाणी मेळावा भरत होता. पण, गेल्यावर्षी शिवसेना फुटल्यानंतर यावर्षी मुंबईत शिवसेना वर्धापनदिनाचे दोन कार्यक्रम दोन वेगवेगळ्या ठिकाणी काल (दि.१९ जून) पार पडले. (Latest Marathi News)

Shivsena Vardhapan Din  Eknath Shinde : Uddhav Thackeray
India China Dispute : लडाख सीमेवरील भारताची २६ गस्त ठिकाणे चीन घेतली ताब्यात? काँग्रेसचा गंभीर आरोप!

वर्धापनदिनानिमित्त ठाकरे गटाचा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा कार्यक्रम मुंबईत माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात काल (ता.१९) सायंकाळी तर, शिवसेनेचा (शिंदे) रात्री गोरेगावात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला. मात्र, पिंपरी -चिंचवडमध्ये यानिमित्त खास कार्यक्रम झाले नाहीत. वर्धापनदिन सोशल मिडीयातच साजरा झाला. त्यावरच शुभेच्छा देण्यात आल्या.

कारण ठाकरे गटाचे शहरप्रमुख अॅड सचिन भोसले हे संत ज्ञानेश्वर महाराज आषाढ वारीच्या पालखी सोहळ्याला गेलेले आहेत. काल वर्धापनदिनी ते लोणंद येथे होते. तर, शिंदे शिवसेना उपनेते आणि मावळचे खासदार श्रीरंग बारणे, त्यांचे पुत्र आणि युवासेना अधिकारी विश्वजीत बारणे, जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, शहरप्रमुख निलेश तरस, महिला शहर संघटिका सरिता साने, मावळ शिवसेना तालुका प्रमुख राजेश खांडभोर आदी वर्धापनदिन सोहळ्याला गोरेगाव, मुंबईला गेले होते. पुणे जिल्ह्यातील दुसरे शिवसेना उपनेते, शिरूरचे तीनवेळचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील हे ही आपल्या पदाधिकाऱ्यांसह गोरेगावला पोहचले होते.

Shivsena Vardhapan Din  Eknath Shinde : Uddhav Thackeray
Sarkarnama Exclusive : किस्से आणि अनुभव Chandrashekhar Bawankule यांच्याशी दिलखुलास गप्पा | BJP

लोणावळ्यात ठाकरे सेनेकडून वर्धापनदिनी स्वच्छता मोहीम :

उद्धव ठाकरे गटाचे माजी पुणे जिल्हाप्रमुख मच्छिंद्र खराडे यांनी वर्धापनदिनानिमित्त लोणावळ्यातील पर्यटनस्थळांची स्वच्छता केली. गेली १५ वर्षे ते हा उपक्रम घेत आहेत. त्यात त्यांनी व त्यांच्या पन्नास-साठ सहकाऱ्यांनी तीस गोण्या प्लॅस्टिक बाटल्या, दारूच्या, बिअरच्या बाटल्या. प्लॅस्टिक प्लेट्स, बाऊल्स असा घातक कचरा गोळा केला. त्याशिवाय पालापाचोळ्यासारखा सुखा कचरा गोळा करून त्याचीही विल्हेवाट लावली.

प्रसिद्ध लायन पॉईंट, आतवन येथे हे स्थळ स्वच्छता अभियान सालाबादप्रमाणे घेण्यात आले. त्यात खराडेंसह प्रसाद शिर्के, सचिन वाळके, महेश खराडे, राजू हिरवे, विश्वास घोडके, रमेश मराठे, सचिन बांगर, सौरभ कडू,रोहन कालेकर,विजय चौरे, पांडुरंग आखाडे, सुनील कदम, कोंडीबा गोरे, सनी साळुंखे, कपिल साळवे या शिवसैनिकांसह ग्रामस्थांनीही सहभाग घेतला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com