Yogesh Kshirsagar Sarkarnama
मराठवाडा

Beed Politics : काकांच्या विरोधानंतरही पुतण्या योगेश क्षीरसागर करणार अजित पवार गटात पक्षप्रवेश !

Datta Deshmukh

Beed News : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) डॉ. योगेश क्षीरसागर व डॉ. सारिका क्षीरसागर यांचा प्रवेश निश्चित झाला आहे. आज बुधवारी दुपारी क्षीरसागर दाम्पत्य मुंबईतील गरवारे हॉलमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांसह प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार आहेत. त्यांचे समर्थक माजी नगरसेवक, सरपंच, सेवा संस्थांचे चेअरमन यासाठी पहाटेच मुंबईत दाखल झाले. यामुळे आता बीड राजकारणात अजित पवारांना मोठे राजकीय बळ मिळाल्याचे मानले जात आहे. (Latest Marathi News)

राज्यात नवे राजकीय समीकरण घडून आल्यापासून डॉ. योगेश क्षीरसागर व डॉ. सारिका क्षीरसागर यांचा अजित पवार गटात प्रवेशाबाबत क्षीरसागर कुटूंब व समर्थकांमध्ये चर्चा सुरु होती. अखेर माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांना सोडून एकट्याने प्रवेशाचा निर्णय डॉ. क्षीरसागर यांनी घेतला. बुधवारी मुंबईतील चर्चगेट भागातील गरवारे हॉल या ठिकाणी अजित पवार यांच्यासह प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत दुपारी तीन वाजता हा प्रवेश सोहळा होणार आहे.

दरम्यान, पालिकेच्या राजकारणाची भिस्त सांभाळणाऱ्या माजी नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी शहराची धुरा योगेश क्षीरसागर यांच्यावर सोपविली आहे. अलिकडे शहरातील राजकारण योगेश क्षीरसागर सांभाळत आहेत. आगामी नगरपालिका निवडणूक देखील त्यांच्याच नेतृत्वाखाली लढण्याची तयारी झाली आहे. तर, त्यांच्या पत्नी डॉ. सारिका क्षीरसागर देखील शहरासह मतदार संघात सामाजिक व राजकिय क्षेत्रात सक्रीय झाल्या आहेत.

शहरातील विकासाच्या दृष्टीने निधी उपलब्ध व्हावा या हेतूने अजित पवार गटात प्रवेश करावा, अशी त्यांची इच्छा होती. मात्र याला त्यांचे काका माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी नकार दिल्यानंतर योगेश क्षीरसागर यांनी स्वतंत्रपणे प्रवेशाचा निर्णय घेतला. माजी नगरसेवक, सरपंच, सेवा सोसायटीचे चेअरमन त्यांच्यासोबत प्रवेश करणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT