योगेश क्षीरसागर यांनी बीड नगरपरिषद निवडणुकीतील सर्व ५२ नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मीच ठरवणार असल्याचे स्पष्ट केले.
त्यांच्या या भूमिकेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत नाराजी व पेच निर्माण झाला आहे.
पक्षातील काही गटांनी निर्णय प्रक्रियेतील एकाधिकारशाहीविरोधात आवाज उठवला आहे.
Beed Municipal Council News : आपल्या नेतृत्वाला आव्हान देणाऱ्यांना उमेदवारी नाही, निवडणुकीचे सुत्र द्यायचे तर ५२ नगरसेवकपदाचे आणि नगराध्यक्ष पदाचा उमेदवारही आपण ठरवू, अथवा... अशी ठाम भूमिका डॉ. योगेश क्षीरसागर यांनी घेतली आहे. त्यामुळे बीड राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चांगलाच पेच निर्माण झाला आहे. मागच्या वेळी नगरसेवक असलेल्यांचा मोठा गट त्यांच्या विरोधात आहे. त्यामुळे आता तोडगा काढण्यासाठी चांगलाच खल सुरु आहे.
मागच्या निवडणुकीत डॉ. भारतभूषण क्षीरसागर राष्ट्रवादी काँग्रेसकडून नगराध्यक्षपदावर विजयी झाले. तर, त्यांच्या नेतृत्वाखाली 21 नगरसेवक विजयी झाले. मात्र, पुढे त्यांनी एमआयएम, संदीप क्षीरसागर यांची काकू नाना आघाडीचे नगरसेवक आपल्या गोटात ओढले. मात्र, त्यानंतर अमर नाईकवाडे, फारुक पटेल, विनोद मुळूक आदींसह 10 हून अधिक नगरसेवकांनी योगेश क्षीरसागर यांचे नेतृत्व अमान्य केले.
विधानसभा निवडणुकीत वरिष्ठ नेत्यांच्या मध्यस्थीने या नगरसेवकांनी क्षीरसागरांचा प्रचार केला असला तरी काहींच्या भूमिकेबद्दल क्षीरसागर यांना साशंकता आहे. त्यामुळे पक्षातील माजी नगरसेवकांचा गट त्यांच्यापासून दुर होता. दरम्यान, बीड नगरपालिकेवर अनेक वर्षांची सत्ता असल्याने डॉ. क्षीरसागरांना माणणाराही मोठा वर्ग शहरात आहे.
मात्र, वर्षानुवर्षे उमेदवार निवडीचे अधिकार, नेतृत्व डॉ. क्षीरसागरांकडे नको, अशी थेट भूमिका या माजी नगरसेवकांनी घेतली. क्षीरसागरांनी नगरपालिकेच्या अनुषंगाने बैठक घेताच पक्षाची पुन्हा बैठकही बोलविली. आता उमेदवार यादी अंतिम करण्याच्या शेवटच्या टप्प्यात क्षीरसागरांनी याच मंडळींना उमेदवारी नको, अशी थेट भूमिका घेतली आहे.
निवडणुकीसाठी लागणारा 'दाम' मी खर्च करणार असेल तर उमेदवारही मिच निवडणार. त्यामुळे आपल्याला मोठा वाटा नको तर 52 नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष या दोन्ही पदांचे उमेदवार आपणच निश्चित करु, अशीही त्यांची भूमिका असल्याचे सुत्रांनी सांगीतले. असेही पुर्वी त्यांनी आपल्याला विरोध केला आणि भविष्यातही विरोध करतील, त्यापेक्षा त्यांना आताच कोठे जायचे ते जाऊ द्या, अशी भूमिका घेतली आहे.
दरम्यान, या माजी नगरसेवकांची उठबस अमरसिंह पंडित यांच्याकडे होती. डॉ. क्षीरसागरांनी यापूर्वीच बैठकीत पंडितांबद्दल त्यांनी आपली नगरपालिका विजयी करुन दाखवावी, अशी भूमिका मांडत थेट आव्हान दिले होते. आता यातून तोडगा काढण्यासाठी निरीक्षक माजी आमदार संजय दौंड आणि डॉ. क्षीरसागरांत बैठका सुरु आहेत. पक्षानेही या ओढाताणीच्या पार्श्वभूमीवर नवनाथ जरे नावाचे दुत पाठविले आहेत.यातून काय तोडगा निघतो, हे पाहणे औत्सुक्याचे आहे.
1. योगेश क्षीरसागर यांनी नेमके काय वक्तव्य केले?
त्यांनी म्हटले की बीड नगरपरिषद निवडणुकीत सर्व उमेदवार मीच ठरवणार असून अंतिम निर्णय माझाच असेल.
2. या वक्तव्यावर राष्ट्रवादीत काय प्रतिक्रिया उमटल्या?
या वक्तव्यामुळे पक्षात असंतोष पसरला असून काही नेते नाराजी व्यक्त करत आहेत.
3. बीड नगरपरिषदेत किती पदांसाठी निवडणूक होणार आहे?
५२ नगरसेवक पदे आणि एक नगराध्यक्ष पदासाठी निवडणुका होणार आहेत.
4. पक्ष नेतृत्वाने या वादावर काही प्रतिक्रिया दिली का?
अधिकृत भूमिका अद्याप स्पष्ट नाही, मात्र वरिष्ठ नेत्यांनी अंतर्गत मतभेद मिटवण्यासाठी संवाद सुरू केल्याचे कळते.
5. या परिस्थितीचा निवडणुकीवर काय परिणाम होऊ शकतो?
अंतर्गत गटबाजी कायम राहिल्यास राष्ट्रवादीच्या विजयावर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.