Ajit Pawar And Yogesh Kshirsagar : मुंडेंकडून ‘लिफ्ट’, पवारांकडून ‘बळ’; राष्ट्रवादीच्या जनसन्मावर क्षीरसागरांचा वरचष्मा

Ajit Pawar jan samman rally in Beed : बीडमध्ये अजित पवार यांच्या जनसन्मान रॅलीत डॉ. सारिका आणि डॉ. योगेश क्षीरसागर यांचा दबदबा राहिला. त्यामुळे उमेदवारीच्या स्पर्धेत क्षीरसागर दाम्पत्यापैकी एक जण आघाडीवर असणार, अशी चर्चा आहे.
Ajit Pawar
Ajit Pawar Sarkarnama
Published on
Updated on

Beed News : माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांना सोडून धनंजय मुंडेंचे नेतृत्व स्वीकारलेल्या डॉ. सारिका आणि डॉ. योगेश क्षीरसागर यांना मुंडेंनी वर्षभरात चांगलीच पॉलिटीकल लिफ्ट दिली.

पण, परवाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महत्वकांक्षी जनसन्मान यात्रेचे नियोजन पूर्णपणे हाती आल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा ‘वादा आणि बळ’ देखील डॉ. क्षीरसागर दाम्पत्यालाच असल्याचे दिसले.

गेल्या वर्षी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडून अजित पवार सहकाऱ्यांसह महायुतीमध्ये सहभागी झाले. अजित पवार (Ajit Pawar) उपमुख्यमंत्री, तर धनंजय मुंडे यांना कृषीमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळाले. त्यानंतर डॉ. योगेश क्षीरसागर यांनी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचा हात सोडून धनंजय मुंडे यांना साथ देण्याचा निर्णय घेतला.

मुंडेंनीही त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या बीड विधानसभेचे अध्यक्षपद दिले. तेव्हापासून डॉ. क्षीरसागर आणि त्यांच्या पत्नी डॉ. सारिका मतदार संघात विविध माध्यमांतून संपर्क वाढवित आहेत. लोकसभा निवडणुकीत देखील पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या प्रचाराची सर्वाधिक सूत्र डॉ. क्षीरसागरांकडेच होती. नुकत्याच डॉ. क्षीरसागरांनी आयोजित केलेल्या एका मेळाव्यात धनंजय मुंडेंनी बीडची जागा राष्ट्रवादी काँग्रेसचीच असेल, असे सांगितले. त्यामुळे उमेदवारीच्या स्पर्धेत डॉ. क्षीरसागर दाम्पत्यापैकी एक जण आघाडीवर असेल, असा त्यांच्या समर्थकांचा विश्‍वास आहे.

Ajit Pawar
Beed News : पंकजा अन् धनंजय मुंडेंबाबत वादग्रस्त वक्तव्य, हल्ला प्रकरणात अटक; तुरूंगातून बाहेर येताच माजी जिल्हाप्रमुख म्हणाले...

डॉ. क्षीरसागर यांचा वरचष्मा

दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सरकारने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण, मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण कार्यक्रम, शेतकऱ्यांची वीज बिल सवलत आदी योजनांचा उहापोह करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरात जनसन्मान यात्रा काढली. या यात्रेच्या व्यासपीठ आणि मंडप उभारणीपासून ते दुचाकी रॅली आणि सभा, अशा सर्वच बाबींवर डॉ. क्षीरसागर यांचा वरचष्मा राहिला.

Ajit Pawar
MLA Jitesh Antapurkar : काँग्रेसला आणखी एक धक्का, आमदार अंतापूरकर उद्या भाजपमध्ये

समर्थकांचा दावा

सभास्थळाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या ‘अजितदादांचा वादा आणि बळ’ अशा आशयाच्या स्वागत कमानीही त्यांच्याच होत्या. अजित पवार आणि धनंजय मुंडे या दोघांच्याच भाषणात प्रास्ताविकही डॉ. योगेश क्षीरसागरांचेच होते. त्यामुळे पक्षाच्या महत्वकांक्षी कार्यक्रमाची धुरा मिळणे म्हणजे अजित पवार यांचा ‘वादा आणि बळ’ डॉ. क्षीरसागरांनाच आहे, असा दावा त्यांचे समर्थक करत आहेत. दरम्यान, महायुतीत बीडची जागा शिवसेनेची असल्याने ती जागा पक्षाला सुटणे आणि पक्षातील इतर इच्छुक स्पर्धकांना मागे सारण्यात आता डॉ. क्षीरसागर किती यशस्वी होतात हे पाहणे महत्वाचे आहे. त्यात धनंजय मुंडे यांचा रोलही सर्वात महत्वाचा असणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com