Beed- Amruta River  Sarkarnama
मराठवाडा

पूलावरुन वाहून गेल्याने तरुणाचा मृत्यू; ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा

सरकारनामा ब्युरो

बीड : गेल्या वर्षांपासून बीडच्या (Beed) भोजगाव येथील अमृता नदीवरील (Amruta River) पूल वाहून गेला. मात्र या वाहून गेलेल्या पूलाने आणखी एका तरुणाचा बळी घेतल्याची माहिती समोर आली आहे. सुदर्शन संत (Sudarshan Sant) असे पूलावरून वाहून गेलेला संबंधित तरुणाचे नाव आहे. आता जोपर्यंत पालकमंत्री, आमदार, जिल्हाधिकारी येत नाहीत तोपर्यंत प्रेत हलवणार नाही. असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुदर्शन संत (Sudarshan Sant) अर्धवट पूलावरुन गेलेल्या पूलावरुन सावडण्याच्या कार्यक्रमाला जात होता. मात्र पाय घसरल्याने तो पाण्यात पडला आणि पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याने त्याचा मृत्यू झाला. धक्कादायक म्हणजे, ज्या मुलीच्या सावडण्याच्या कार्यक्रमाला तो निघाला होता त्या मुलीचा मृतदेह देखील दोन दिवसांपूर्वी तिच्या वडिलांना आपल्या खांद्यावर घेऊन जावा लागला होता. आता या नेहमी होणाऱ्या दुर्घटनेमुळं ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांनी रस्त्यावर मृतदेह ठेवून रस्ता रोको करत लोकप्रतिनिधी व प्रशासनाचा निषेध करत आहेत.

गेल्या काही वर्षांपासून भोजगावला जोडणारा अमृता नदीवरील पुल वाहुन गेला आहे. याआधी देखील या पूलावरुन लोक वाहुन जाण्याच्या घटना घडल्या आहेत. आज परत ही घटना घडल्यामुळे निगरगट्ट लोकप्रतिनिधी व प्रशासन आणखी किती बळी घेणार ? असा संतप्त सवाल भोजगाव ग्रामस्थ करत आहेत. दरम्यान नागरिकांनी मृतदेह गेवराई - शेगाव राज्य महामार्गावर ठेवून महामार्ग बंद केलेला आहे.

दरम्यान, दोन दिवसापुर्वी तरुणी वाहून गेल्याने तिचाही मृत्यू झाला. तिच्या मृत्यूने गावात आधीच शोककळा पसरली होती. पोलिसांनी बैलगाडीची व्यवस्था केली होती पण नदी ओलांडता आली नाही. मृत तरुणीच्या वडिलांना मृतदेह खांद्यावर घेऊन अमृता नदी ओलांडावी लागली आणि त्यानंतर ते उमरपूर गावात असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात पोहोचले. स्थानिक लोकांना दररोज अशा समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यात सुदर्शनचाही तशाच प्रकारे मृत्यू झाल्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत.

त्यानंतरही तरुणीच्या यातना संपल्या नाहीत. तिच्या वडीलांनी पुन्हा आपल्या खांद्यावर घेऊनच तिचा मृतदेह स्मशानभुमीत आणला आणि तिच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. स्थानिक ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, भोजगावमध्ये अनेक वेळा मुसळधार पावसामुळे रस्ता वाहून जातो. अशा परिस्थितीत लोकांना अमृता नदी ओलांडून जावे लागते. स्थानिक ग्रामस्थ जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना पूल बांधण्यास सांगत आहेत, परंतु या मागण्या अद्याप पूर्ण झालेल्या नाहीत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT