आमचं ऐका नाहीतर, मुख्यमंत्री दिल्लीला गेलेलेच आहेत

पुणे, पिंंपरी-चिंचवडमध्ये शिवसेनेचा महापौर झाला नाही ही आमची खंत आहे
Sanjay Raut
Sanjay Rautsarkarnama
Published on
Updated on

पिंपरी : राज्याचे मुख्यमंत्री आपले आहेत, पालकमंत्री ही आपलेच आहेत त्यांना सांगा त्यांनी ऐकावे लागेल. आपल्याला एकत्र काम करायचं आहे. सेनेच्या कार्यकर्त्यांना नाराज करु नका, अजित पवार ही मुख्यमंत्र्यांचं ऐकतात, नाहीतर मुख्यमंत्री आज दिल्लीत गेले आहेत. असा चिमटा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यावेळी बोलताना काढला. भोसरीमध्ये आयोजित शिवसेनेच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.

Sanjay Raut
नगरसेवकांचे धाबे दणाणले; प्रगती पुस्तकाच्या आधारेच मिळणार तिकीट

पुणे, पिंंपरी-चिंचवडमध्ये शिवसेनेचा महापौर झाला नाही ही आमची खंत आहे. पण येत्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेचा महापौर झाला पाहिजे ही अपेक्षा ठेवली तर काय चुकलं असा सवाल राऊत यांनी केला. येत्या निवडणुकीसाठी आपण एकटयाने लढण्याची तयारी केली पाहिजे. सोबत आलात तर तुमच्या सोबत नाही तर तुमच्याशिवाय, असे म्हणत त्यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना महापालिका एकट्याने लढण्याचे आवाहन केले.

Sanjay Raut
भाजप आमदार सुनील कांबळेंची महिला अधिकाऱ्याला शिवीगाळ; ऑडिओ क्लिप व्हायरल

पुण्याच्या पालकमंत्र्यांच्या दराऱ्याला घाबरु नका. भोसरी विधानसभेत शिवसेनेचा एकही नगरसेवक निवडून न येणे याची शिवसेनेसाठी मोठी खंत आहे. म्हणून आता भोसरीतून शिवसेनेला काम सुरु करायला हवं. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. ५५ जागांवर आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री होतो, तर ४०-५० जागांवर शिवसेनेचा महापौर होणार नाही का, असेही राऊत म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com