Maratha Reservation Sarkarnama
मराठवाडा

छत्रपती संभाजी राजेंच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून तरुणाचे जलकुंभावर उपोषण

यापूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी यासाठी कोरड्या विहीरीत, नदीत तराफ्यावर बसून तर कधी सरण रचून ढोणे यांनी लक्षवेधी उपोषणे केलेली आहेत. (Maratha Reservation)

सरकारनामा ब्युरो

पूर्णा : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी छत्रपती संभाजी राजे करत असलेल्या उपोषणाला पाठिंबा म्हणून पांगरा ढोणे येथील तुकाराम ढोणे यांनी ८० फूट उंचीच्या जलकुंभावर आमरण उपोषण सुरु केले आहे. (Chhatrapati Sambhaji Raje) महाराजांचे उपोषण जो पर्यंत सुटणार नाही, तोपर्यंत खाली न उतरण्याचा पावित्रा तुकाराम ढोणे यांनी घेतला आहे. (Parbhani)

दरम्यान त्यांना पाठिंबा देण्यासाठी परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यातील अनेक मराठा युवक पांगरा ढोणे येथे दाखल होत आहेत. (Maratha Reservation) संभाजीराजेंनी आझाद मैदानावर मराठा अरक्षणप्रश्नी उपोषण सुरू केल्यानंतर महाराजांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून सर्वत्र विविध संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत.

तुकाराम ढोणे यांनी देखील या उपोषणाला पाठिंबा म्हणून जलकुंभावर आमरण उपोषण सुरू केले. यापूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी यासाठी कोरड्या विहीरीत, नदीत तराफ्यावर बसून तर कधी सरण रचून ढोणे यांनी लक्षवेधी उपोषणे केलेली आहेत. त्यांच्या उपोषणाला नेहमीच गावकऱ्यांचा पाठिंबा राहिला आहे. आता त्यांनी त्यांच्या मूळ गावी पांगरा ढोणे येथील ८० फूट उंच जलकुंभावर चढून उपोषण सुरू केले आहे.

यावेळी गावकऱ्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळालच पाहिजे यासाठी घोषणा देत संभाजी महाराजांच्या उपोषणाला पाठिंबा दर्शवत आरक्षणाची मागणी केली. पोलीस त्यांना जलकुंभावरून खाली उतरून इतरत्र उपोषण करण्याची विनंती करत आहेत. पण त्यांनी जलकुंभावरच उपोषण सुरू केल्याने पोलिस देखील हतबल झाले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT