Yuvasena challenge Mla Santosh Bangar News Hingoli Sarkarnama
मराठवाडा

Yuvasena : बांगर पुन्हा निवडून आले तर सगळी संपत्ती दान करील, भिक्षा मागून जगेन..

युवासेनेचे राज्य विस्तारक दिलीप घुगे यांनी आमदार संतोष बांगर यांना आव्हान दिले असून ते पुन्हा निवडून आले तर आपली सगळी संपत्ती दान करण्याची घोषणा त्यांनी केली आहे. ( Yuvasena)

सरकारनामा ब्युरो

हिंगोली : बंडखोर आमदार संतोष बांगर हे जर पुन्हा निवडून आले तर मी माझी वडिलोपार्जित आणि कमावलेली सगळी प्राॅपर्टी दान करील, भिक्षा मागून जगेन, असे जाहीर आव्हान युवासेनेचे राज्य विस्तारक दिलीप घुगे यांनी दिले आहे. (Hingoli) हिमंत असेल तर राजीनामा देवून निवडणुक लढवून दाखवा, असेही घुगे यांनी म्हटले आहे.

राज्यातील बंडखोर आमदारांच्या विरोधात शिवसेना-युवासेना (Yuvasena) अधिक आक्रमक झाली आहे. आदित्य ठाकरे शिवसंवादच्या माध्यमातून बंडखोरांवर तुटून पडले आहेत, तर युवासेनेचे पदाधिकारी देखील आमदारांना आव्हान देत आहेत. कळमनुरीचे बंडखोर (Santosh Bangar) आमदार संतोष बांगर व्यवस्थापकाला मारहाण केल्यामुळे सध्या चांगलेच चर्चेत आहेत.

या कृत्यावरून त्यांच्यावर टीकेची झोड देखील उठली आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी तर तुम्हाला सत्तेची मस्ती आली आहे का? असा संतप्त सवाल सत्ताधाऱ्यांना केला होता. आदित्य ठाकरेंकडून वारंवार गद्दारांना राजीनामा देवून पुन्हा निवडून येवून दाखवा असे आव्हान दिले जात आहे. आता त्यांचे पदाधिकारी देखील तीच भाषा वापरत असल्याचे दिसून आले आहे.

युवासेनेचे राज्य विस्तारक दिलीप घुगे यांनी आमदार संतोष बांगर यांना आव्हान दिले असून ते पुन्हा निवडून आले तर आपली सगळी संपत्ती दान करण्याची घोषणा त्यांनी केली आहे. घुगे म्हणाले, बांगर पुन्हा निवडून येऊ शकत नाही, माझे तर त्यांना चॅलेंज आहे, त्यांनी राजीनामा द्यावा, किंवा जेव्हा केव्हा निवडणूक लागेल तेव्हा पुन्हा निवडून येवू दाखवावे.

असे झाले तर मी माझ्या नावावर असलेली वडिलोपार्जीत, कमावलेली संपत्ती दान करून टाकेल, भिक्षा मागून जगेल. पण बांगर यांच्यामध्ये एवढी हिमंत नाही की ते राजीनामा देवून निवडणूकीला समोर जातील. त्यांच्यात हिमंत असती तर त्यांनी पक्षच सोडला नसता, असेही घुगे म्हणाले. दरम्यान, बांगर यांनी मात्र घुगे यांच्या आव्हानाला मी महत्व देत नाही असे म्हणत यावर बोलणे टाळले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT