काॅंग्रेस, राष्ट्रवादी, ठाकरेंकडे कार्यकर्तेच राहणार नाहीत ; भाजपमध्ये लवकरच मोठे प्रवेश..

गडकरी यांनी तर फडणवीस दिल्लीला गेल्यास बावनकुळे हे राज्याचे मुख्यमंत्री होऊ शकतात, अशी भविष्यावाणी देखील नुकतीच केली. (Chandrashekhar Bawankule,Bjp)
Bjp State President Chandrashekar Bawankule News, Akola
Bjp State President Chandrashekar Bawankule News, AkolaSarkarnama
Published on
Updated on

अकोला : भाजपमध्ये लवकरच मोठे प्रवेश होणार आहेत, त्यामुळे भविष्यात काॅंग्रेस, राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे कार्यकर्तेच शिल्लक राहणार नाहीत, असा दावा (Bjp)भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekar Bawankule) यांनी केला आहे. अकोला येथे प्रसार माध्यमांशी बोलतांना फडणवीस हे दिल्लीला जाणार नसून ते महाराष्ट्रातच राहतील असेही त्यांनी स्पष्ट केले.

शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रीपद मिळाले नसले तरी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर पक्षाने प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली आहे. (Maharashtra) फडणवीस यांच्यावर बावनकुळे यांची उमेदवारी कापल्याचा आरोप गेल्या विधानसभा निवडणुकीत झाला होता. मात्र आता फडणवीस यांच्यामुळेच बावनकुळे यांना प्रदेशाध्यक्षपद मिळाल्याचे बोलले जाते.

दरम्यान, चंद्रशेखर बावनकुळे यांनी येत्या काही दिवसात राष्ट्रवादी, काॅंग्रेस आणि उद्धव सेनेतून मोठे नेते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा गौप्यस्फोट बावनकुळे यांनी केला. ते म्हणाले, राज्यातील सत्तांतरानंतर विरोधी आघाडीमध्ये कमालीची अस्वस्थता आहे. आघाडीतील तीनही पक्षांकडे कार्यकर्तेच राहणार नाही अशी परिस्थिती आहे.

येत्या काही दिवसांत अनेक मोठे नेते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात भाजप हा राज्यातील नंबर एकचाच पक्ष राहणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची केंद्रीय समितीमध्ये निवड झाल्यानंतर ते दिल्लीला जाणार अशा चर्चांना उधाण आले आहे.

Bjp State President Chandrashekar Bawankule News, Akola
Aditya Thackeray : गद्दारांना चांगले खाते मिळेल असे वाटले, पण मिळाला बाबाजीचा ठुल्लू

समितीतून वगळण्यात आलेले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तर फडणवीस दिल्लीला गेल्यास बावनकुळे हे राज्याचे मुख्यमंत्री होऊ शकतात, अशी भविष्यावाणी देखील नुकतीच केली. यावर देखील बावनकुळे यांनी स्पष्टीकरण देत फडणवीस कुठेही जाणार नाहीत, ते महाराष्ट्रातच राहतील असे सांगत आपण मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नसल्याचे सांगून टाकले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com