Fakir Shabbir Babu sarkarnama
मराठवाडा

अख्खा वॉर्ड झटला; पण पठ्ठ्याचा भोपळा नाही फुटला : काँग्रेस उमेदवाराला शून्य मते!

या वॉर्डात एकूण १९८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

सरकारनामा ब्यूरो

बीड : मागील काही वर्षांपासून ‘अख्खा गाव झटला; पण पठ्ठ्या जागचा नाही हटला’ अशी नवी राजकीय म्हण प्रचलित झाली असून बॅनरवरही फोटोसह या ओळी झळकतात. पण, अख्खा वॉर्ड झटूनही एका पठ्ठ्याच्या मताच्या आकड्यांचा भोपळाचा फुटला नसल्याचे समोर आले आहे. बीड जिल्ह्यातील शिरूर कासार नगर पंचायत निवडणुकीत (Nagar Panchayat election) काँग्रेस (Congress) उमेदवार फकीर शब्बीर बाबू यांचा हा निकाल असून सध्या सोशल मीडियावर याचीच चर्चा आहे. (Zero votes for Congress candidate in Shirur Kasar Nagar Panchayat elections)

बीड जिल्ह्यातील शिरुर कासारसह आष्टी, पाटोदा, वडवणी व केज नगर पंचायतींच्या निवडणुकांचे निकाल बुधवारी (ता. २० जानेवारी) जाहीर झाले. तसे जिल्हाभरात धक्कादायक निकाल लागले आहे. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व काँग्रेस पक्षापेक्षा निकालात भाजप सरस ठरले आहे. निकालानंतर अनेक नेत्यांबाबत ‘दिल्लीत गोंधळ’ अशी स्थिती दिसली. वडवणी व केजमध्ये शिवसेनेच्या १९ पैकी तब्बल १६ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. मात्र, आता एका उमेदवाराचा मतांमध्ये भोपळाच फुटला नसल्याचेही समोर आले आहे.

पूर्वीपासून काँग्रेसचे पाईक असलेले ७२ वर्षीय फकीर शब्बीर बाबू काँग्रेस पक्षाकडून शिरुर कासार नगर पंचायतीच्या वॉर्ड क्रमांक सहामधून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. या वॉर्डात एकूण १९८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. भाजपच्या गणेश भांडेकर यांनी १५५ मते मिळवून दणदणीत विजय मिळविला. तर राष्ट्रवादीचे उमेदवार शांतीलाल चोरडिया यांना ४३ मतांवर समाधान मानाव लागलं.

सुरुवातीला चर्चा रंगली ती भांडेकर यांनी भराडीया यांच्यावर शंभराहून अधिक मतांनी मिळविलेल्या विजयाची. पण, निकालाची अधिकृत आकडेवारी आल्यानंतर फकीर शब्बीर बाबू यांच्या पुढे भोपळा (शून्य) होता. मग, त्यांचे स्वत:च मतदेखील त्यांना कसे पडले नाही, अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली. मात्र, त्यांचे मतदान इतर वॉर्डात आणि त्यांनी नशिब आजमावले इतर वॉर्डात असे समोर आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT