पिंपरी पोलिसांची MPतील गुंडांशी झटापट; अंगावर गाडी घातल्याने एक कर्मचारी गंभीर

महिनाभरापूर्वी काहीशी अशीच घटना घडली होती. खेड (जि. पुणे) तालुक्यातील कोये येथे पिंपरी-चिंचवड पोलिस आणि तीन सराईत गुंडांमध्ये चकमक उडाली होती.
Urse Tolnaka
Urse Tolnakasarkarnama
Published on
Updated on

पिंपरी : पुणे-मुंबई द्रूतगती महामार्गावर (एक्स्प्रेस वे, Express way) ऊर्से टोलनाक्यावर (Urse Tolnaka) गुरुवारी (ता. २० जानेवारी) मध्य प्रदेशातील (एमपी) सराईत गुंडांच्या टोळीने आपली मोटार पोलिस (police) पथकावर घातली. त्यात एक पोलिस गंभीर जखमी झाला आहे. दरम्यान, या टोळीतील आठजणांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत. (Goons from Madhya Pradesh attacked the Pimpri police at Urse Tolnaka)

महिनाभरापूर्वी काहीशी अशीच घटना घडली होती. खेड (जि. पुणे) तालुक्यातील कोये येथे पिंपरी-चिंचवड पोलिस आणि तीन सराईत गुंडांमध्ये चकमक उडाली होती. दोन्ही बाजूंनी दोन-दोन गोळ्या झाडूनही त्यात कुणी जखमी झाले नव्हते. मात्र, सशस्त्र गुंडांना निशस्त्र करताना पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश हे किरकोळ जखमी झाले होते. त्यामुळे नंतरचे काही दिवस त्यांना आपला एक हात प्लॅस्टरमध्ये ठेवावा लागला होता. त्यांनी या एन्काउंटरच्या वेळी गुंडावर झाड फेकून मारल्याने गुंड पडून हाती लागल्याचा दावा पोलिसांनी केला होता. त्यामुळे या चकमकीची सोशल मिडियात चांगलीच चर्चा रंगली होती.

Urse Tolnaka
राष्ट्रवादीचे अमोल कोल्हे नथुरामच्या भूमिकेत; आव्हाड म्हणतात, ‘मला हे मान्य नाही’!

पोलिसांवर हल्ला झाल्याचे समजताच शहर पोलिसांची सर्व गुन्हे शाखा तथा क्राईम ब्रॅंच घटनास्थळी धावली. अंदाजे नव्वद अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहा गुंडांना जागीच पकडले. तर जवळच्याच ऊर्से डोंगरात पळालेल्या तिघांपैकी दोघांची धरपकड केली. सकाळी साडेअकरा वाजता सुरु झालेली ही कारवाई काही तास सुरु होती.

Urse Tolnaka
मुख्यमंत्र्यांनी वीर-भाटघरच्या धरणात येऊन बघावे, शिवसेनेला उतरती कळा लागल्याचे दिसेल!

दरम्यान, गंभीर जखमी झालेल्या पोलिसाला शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांकडून सायंकाळी उशीरापर्यंत या घटनेबाबत अधिकृत माहिती देण्यात आली नव्हती. त्यामुळे पकडलेल्याा गुंडाची नावे व त्यांच्याकडे हत्यारे होती का, याबाबतची माहिती मिळू शकली नाही. पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश हे ट्रेनिंगवर गेले आहेत, त्यामुळे अतिरिक्त आयुक्त डॉ. संजय शिंदे यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. ही झटापट सकाळी साडेअकरा वाजता झाली. गेल्या महिन्यातील शहर पोलिसांचीच कोये येथे झालेली चकमकही याच वेळी, पण रात्री झाली होती.

Urse Tolnaka
किरण माने, सतीश राजवाडे जितेंद्र आव्हाडांच्या भेटीला; बैठकीसाठी अमोल कोल्हेंचा पुढाकार!

एमपीतील सराईत गुंडांची टोळी दोन मोटारीतून ‘एक्सप्रेस वे’ने मुंबईला जात असल्याची टीप शहर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेचे गुंडाविरोधी पथक ऊर्से टोलनाक्यावर दबा धरून बसले होते. सकाळी साडेअकरा वाजता त्या संशयित दोन मोटारी आल्या. सापळा लावून बसलेल्या पोलिस पथकाने त्या थांबविण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या अंगावरच एक गाडी घालण्यात आली. त्यात एक पोलिस कर्मचारी गंभीर झाला आहे. तरीही त्या वाहनांना अटकाव करीत पोलिसांनी सहा जणांची जागीच गठडी वळली. स्थानिक पोलिसांनी घेरल्याचे समजताच तीन गुंड शेजारीच असलेल्या डोंगराच्या दिशेने पळाले. मागील चकमकीचा अनुभव व परप्रांतीय गुंडांकडे अग्निशस्त्रे असल्याची शक्यता ध्यानात घेऊन आणखी पोलिस फोर्स मागवण्यात आला. त्यांनी डोंगर पिंजून काढत पळालेल्या दोन गुंडांना पकडले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com