Chhatrapati Sambhajinagar ZP News : छत्रपती संभाजीनगर महापालिकेत 2017 मध्ये सर्वाधिक 23 जागा जिंकूनही भाजपाला सत्तेपासून रोखण्यात शिवसेना-काँग्रेस हे पक्ष यशस्वी ठरले होत. त्यानंतर आता 2026 मध्ये झालेल्या झेडपी निवडणुकीत भाजपा हाच मोठा भाऊ ठरण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेवर शिवसेना-भाजप या सत्ताधारी पक्षाचा झेंडा फडकणार असा अंदाज साम टीव्हच्या एक्झीट पोलने वर्तवला आहे.
छत्रपती संभाजीनगर महापालिकेत युती तुटल्यानंतर शिवसेना-भाजपने जुळवून घेत जिल्हा परिषदेसाठी युतीची घोषणा केली होती. सिल्लोड-सोयगाव हा आमदार अब्दुल सत्तार यांचा मतदारसंघ वगळता इतर तालुक्यात दोन्ही पक्षाची युती झाली होती. परंतु उमेदवारी अर्ज दाखल करेपर्यंत बऱ्याच घडामोडी घडल्या. अनेक तालुक्यात भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी युती नको, अशी भूमिका घेतली.
त्यामुळे नेत्यांचाही नाइलाज झाला आणि दोन्ही बाजूने आपापल्या उमेदवारांना बी फाॅर्म देण्यात आले. त्यामुळे जाहीर झालेली शिवसेना-भाजप युती ही केवळ कागदावरच राहिली. बहुताश गट आणि गणात हे दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले. तर तिकडे सिल्लोड-सोयगाव विधानसभा मतदारसंघात अब्दुल सत्तार यांनी कोणालाच फिरकू दिले नाही. निवडणुकीत ही स्थिती असतानाही मतदारांमध्ये मोठा उत्साह दिसून आला.
आज प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर आता एक्झीट पोलच्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेवर भाजप-शिवसेना युतीची सत्ता येणार आहे. गेल्या जिल्हा परिषदेत 23 जागांसह मोठा भाऊ राहिलेला भाजपा यावेळीही 26 जागा जिंकत मोठ्या भावाच्याच भूमिकेत राहणार आहे. तर 20 जागा जिंकत शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर असले. या दोन्ही पक्षांच्या सदस्यांची बेरीज ही 46 म्हणजे बहुमतापेक्षाही अधिक होते. त्यामुळे जिल्हा परिषदेचे कारभाही हे भाजप-शिवसेना हेच असणार आहे.
एक्झीट पोलच्या अंदाजानूसार गेल्या वेळी 16 सदस्य असलेल्या काँग्रेसला या निवडणुकीत सर्वाधिक फटका बसताना दिसतो आहे. काँग्रेसची संख्या घसरून केवळ 1 वर येण्याची शक्यता आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आठ जर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला 6 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर एमआयएमचा एक सदस्य निवडून येत त्यांची झेडपीत एन्ट्री होण्याची शक्यता आहे.
भाजप 26 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरणार असला तरी सत्तेच्या चाव्या या शिंदेंच्या शिवसेनेकडे राहणार आहेत. त्यात स्वबळावर लढलेल्या आमदार अब्दुल सत्तार यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. सत्ता स्थापनेसाठीच्या जागांची जुळवा जुळव करताना भाजप-शिवसेनेला अब्दुल सत्तार यांच्या मदतीची गरज भासू शकते. अशी परिस्थिती निर्माण झाली तर जिल्हा परिषद अध्यक्ष पदावर सत्तार दावा सांगू शकतात, अशीही शक्यता नाकारता येत नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.