Sanjay Shirsat On Imtiaz Jaleel : पक्षात माझी काय लायकी आहे, हे मला माहीत आहे; इम्तियाज जलील यांनी सांगण्याची गरज नाही! संजय शिरसाट यांचा पलटवार

Imtiaz Jaleel Statement : उपमहापौर पदाच्या वादावरून इम्तियाज जलील यांच्या टीकेला संजय शिरसाट यांनी जोरदार प्रत्युत्तर देत, पक्षातील आपली लायकी एकनाथ शिंदे यांना माहीत असल्याचे स्पष्ट केले.
Shivsena leader and guardian minister Sanjay Shirsat addressing media after responding to AIMIM MP Imtiaz Jaleel’s remarks amid deputy mayor nomination controversy in Chhatrapati Sambhajinagar.
Shivsena leader and guardian minister Sanjay Shirsat addressing media after responding to AIMIM MP Imtiaz Jaleel’s remarks amid deputy mayor nomination controversy in Chhatrapati Sambhajinagar.Sarkarnama
Published on
Updated on

Shivsena News : शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांची उपमहापौरपदी निवड जाहीर झाल्यानंतर पक्षात एका गटाकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. विशेष म्हणजे, पालकमंत्री संजय शिरसाट यांना विश्वासात न घेता जंजाळ यांचे नाव जाहीर करण्यात आले. त्यामुळे त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नाराजी व्यक्त केली. मात्र, शिंदे यांनी ‘शिरसाट, आपल्याला असेच करायचे आहे,’ असे स्पष्ट केल्यानंतर ते शांत झाले.

या घटनेवरून एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी संजय शिरसाट यांच्यावर टीका करत, त्यांच्या पक्षात त्यांची काय लायकी आहे हे दिसून आले, असा टोला लगावला. इम्तियाज जलील यांनी वीस वर्षे सफाई कामगार म्हणून काम केलेल्या व्यक्तीला उमेदवारी देत निवडून आणले होते. त्यानंतर त्यालाच थेट महापौरपदाची उमेदवारी दिली. ती जाहीर करताना त्यांनी पालकमंत्री संजय शिरसाट यांना डिवचले होते.

‘तुम्ही स्वतःला दलित समाजाचे प्रतिनिधी किंवा हितचिंतक समजत असाल, तर आमच्या उमेदवाराला बाहेरून किंवा आतून पाठिंबा द्या,’ असे आवाहन इम्तियाज जलील यांनी केले होते. पण ज्यांना स्वतःच्या पक्षात किंमत नाही, ते काय करणार, असा सवाल करत त्यांनी शिरसाट यांच्या लायकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. यावर शिरसाट यांनी पलटवार करताना म्हटले, ‘माझ्या पक्षात माझी काय लायकी आहे, हे मला आणि एकनाथ शिंदे साहेबांना चांगले माहीत आहे. इम्तियाज जलील यांनी हे सांगण्याची गरज नाही.’

ते पुढे म्हणाले, ‘एखाद्या विषयावर मतभेद असू शकतात. उपमहापौरपदाबाबत मी माझे मत शिंदे यांच्याकडे मांडले होते. त्यावर त्यांनी “शिरसाट, आपल्याला असेच करायचे आहे,” असे स्पष्ट केल्यानंतर मी ते मान्य केले. यावरून आमच्यात मोठे वाद किंवा मतभेद आहेत, असे मानण्याचे कारण नाही. आमच्या पक्षात आपली मते स्पष्टपणे मांडण्याचा अधिकार आहे. आम्ही वेळोवेळी आमची मते मांडत असतो. कालही शुक्रवार (ता.07) एकनाथ शिंदे यांचा मला फोन आला होता,’ असेही शिरसाट यांनी सांगितले.

काय होता वाद?

जिल्ह्याच्या राजकारणात शिरसाट यांना नडणाऱ्या जंजाळ यांना बाजूला ठेवून आपल्या समर्थकांची वर्णी उपमहापौरपदी लावण्याचा त्यांचा प्रयत्न होता. मात्र, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्याशी असलेल्या जवळच्या संबंधांमुळे राजेंद्र जंजाळ यांनी हा डाव हाणून पाडला.

Shivsena leader and guardian minister Sanjay Shirsat addressing media after responding to AIMIM MP Imtiaz Jaleel’s remarks amid deputy mayor nomination controversy in Chhatrapati Sambhajinagar.
Jalna BJP Victory : कैलास गोरंट्याल यांनी खोतकरांना सत्तेच्या आजूबाजूलाही फिरकू दिलं नाही; जालन्यात शतप्रतिशत भाजप, महापौरपदी वंदना मगरे

शेवटच्या क्षणी संजय शिरसाट यांनी नंदकुमार घोडेले, मुलगी हर्षदा शिरसाट आणि माजी महापौर त्र्यंबक तुपे यांना उमेदवारी अर्ज घ्यायला लावत दबावतंत्राचा वापर केला. मात्र, एकनाथ शिंदे यांनी नाव जाहीर केल्यानंतर शिरसाट यांनी विरोध केल्याची माहिती मिळताच मुंबईहून तातडीने शिवसेना सचिवांचे पत्र आले. त्यात आदेशाचे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले.

Shivsena leader and guardian minister Sanjay Shirsat addressing media after responding to AIMIM MP Imtiaz Jaleel’s remarks amid deputy mayor nomination controversy in Chhatrapati Sambhajinagar.
Shiv Sena deputy mayor : राजेंद्र जंजाळ यांच्या उपमहापौर पदावरून शिवसेनेत वाद; त्र्यंबक तुपेही मैदानात !

याशिवाय, एकनाथ शिंदे यांनी संजय शिरसाट यांना फोन करून कोणतीही गडबड होऊ नये, असे स्पष्ट सांगितले. गेल्या काही महिन्यांपासून जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांच्याकडून शिरसाट यांना वारंवार आव्हान दिले जात होते. महापालिकेसाठी युतीची चर्चा सुरू असताना आपल्या प्रभागातील आणि समर्थकांची तिकिटे कापली जाण्याची शक्यता लक्षात आल्यानंतर जंजाळ यांनी आक्रमक भूमिका घेत थेट शिरसाट यांच्याविरोधातच दंड थोपटले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com