Latur ZP Election Reservation News Sarkarnama
मराठवाडा

ZP Election News: मतभेद विसरून मंत्री एकत्र; लातूर जिल्हा परिषदेत सत्तेची नवी समीकरणे

Latur News : लातूर जिल्हा परिषदेच्या सत्तेसाठी भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्यातील नेते, मंत्री हे आपापसातील मतभेद विसरून एकत्र आले.

Jagdish Pansare

Latur News : लातूर जिल्हा परिषदेच्या सत्तेसाठी भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्यातील नेते, मंत्री हे आपापसातील मतभेद विसरून एकत्र आले. अध्यक्ष, उपाध्यक्षपद ठरल्याप्रमाणे भाजप-राष्ट्रवादीच्या वाट्याला आल्यानंतर आता विषय समिती सभापतीपदाच्या निवडीतही या दोन्ही पक्षांमध्ये 'फिफ्टी फिफ्टीचा' फॉर्म्युला कायम राहिला. सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, माजी मंत्री संजय बनसोडे, भाजपाचे संभाजी पाटील निलंगेकर, अभिमन्यू पवार या नेत्यांनी एकमताने सभापती पदांचे वाटप केल्याने कुठल्याही प्रकारचा वाद या निवडणुकीत झाला नाही.

जिल्हा परिषदेतील समाजकल्याण विभाग सभापतिपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे उत्तम माने, बांधकाम विभाग सभापतिपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्ञानेश्वर बिरादार, महिला व बालकल्याण विभाग सभापतीपदी भाजपच्या शिवकन्या गोडभरले आणि कृषी व पशुसंवर्धन विभाग सभापतीपदी भाजपच्या कविता गोरे यांची सोमवारी निवड झाली. काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने या चारही निवडी बिनविरोध झाल्या.

लातूर जिल्हा परिषदेतील विषय समिती सभापतिपदाच्या निवडीसाठी सोमवारी विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. पीठासीन अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दुपारी दोनला बैठक पार पडली. समाजकल्याण समितीच्या सभापतिपदासाठी शिरूर ताजबंद गटातून निवडून आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे उत्तम माने यांच्याबरोबरच काँग्रेसचे मुकेश भालेराव यांनी आपला अर्ज दाखल केला होता.

महिला व बालकल्याण समिती सभापतिपदासाठी खरोळा (ता. रेणापूर) गटातून निवडून आलेल्या भाजपच्या शिवकन्या गोडभरले यांच्याबरोबरच काँग्रेसच्या योगिता जाधव (औराद शहाजनी) यांनी अर्ज दाखल केला होता. बांधकाम विभाग समिती सभापतिपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्ञानेश्वर बिरादार (तोगरी, ता. उदगीर) यांच्याबरोबरच काँग्रेसचे दत्तात्रय टेकाळे यांनी अर्ज दाखल केला होता.

तर कृषी व पशुसंवर्धन विभाग सभापतिपदासाठी भाजपच्या कविता गोरे (सरवडी, ता. निलंगा), शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तानाजी जाधव (खरोसा, ता. औसा) यांनी अर्ज भरला होता. मात्र, ऐनवेळी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवारांनी अर्ज आपले मागे घेतले. त्यामुळे या पदांच्या बिनविरोध निवडी जाहीर करण्यात आल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT