Ashok Kharat Case: खरातच्या व्हायरल अश्लील व्हिडिओमुळे बदनामी...; पीडितेच्या कुटुंबीयांसमोर नवं संकट, केली 'वर्क फ्रॉम होम'ची मागणी

Nashik Crime News: महिलांना आपल्या जाळ्यात ओढवून त्यांच्यावर अशोक खरातने 'योनी पूजा' आणि 'योनी शुध्दीकरण'च्या विधीच्या नावाखाली लैंगिक अत्याचार केल्याचं समोर आल्यानं खळबळ उडाली होती.
Ashok Kharat Case
Ashok Kharat Case Sarkarnama
Published on
Updated on

Nashik News: नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. त्याच्या एसआयटी चौकशीचा मंगळवारी (ता.31 मार्च) 12 वा दिवस असून पोलिसांना तपासात अनेक धक्कादायक माहिती समोर येत आहे. या प्रकरणात नवनवीन खुलासे केले जात आहे. अशातच खरातचे अश्लील व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. व्हिडिओ शेअर झाल्यामुळे पीडितेच्या कुटुंबीयांसमोर मोठं संकट उभं ठाकलं आहे.

महिलांना आपल्या जाळ्यात ओढवून त्यांच्यावर अशोक खरातने 'योनी पूजा' आणि 'योनी शुध्दीकरण'च्या विधीच्या नावाखाली लैंगिक अत्याचार केल्याचं समोर आल्यानं खळबळ उडाली होती. त्यात खरातचे महिलांसोबतचे अश्लील व्हिडीओ सोशल मीडियावरील वेगवेगळ्या वेबसाईटवर शेअर झाले होते. त्यामुळे पीडित महिलांची कुटुंबे मोठ्या संकटात सापडली आहेत.

सुरुवातीला पीडित महिलांनी भोंदूबाबा अशोक खरातविरोधात एफआयआर दाखल करण्यात पुढे येत नसल्याचं दिसून आलं होतं. पण त्यानंतर एसआयटीचे प्रमुख व आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते यांनी महिलांना तक्रार दाखल करण्याचं आवाहन केलं तसेच महिलांच्या नावांबाबत गोपनीयतेचं पालन करण्यात येईल असं आश्वास्त केलं होतं. यानंतर आता अनेक पीडितांनी याप्रकरणी अशोक खरातविरोधात एफआयआर दाखल केल्या आहेत.

अशोक खरातचे अश्लील व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे आता पीडित महिलांच्या कुटुंबियांना बदनामीची भीती वाटत आहे. व्हिडिओ शेअर केल्यामुळे गोपनीयतेचे उल्लंघन आणि कुटुंबियांचा मानसिक ताण वाढत आहे. त्याचा परिणाम म्हणून साक्षीदार पुढे येण्यास टाळत आहेत, ज्यामुळे तपासात मोठा अडथळा निर्माण होत आहे.

Ashok Kharat Case
Shivsena News: लोकसभा निवडणुकीत 8 पैकी 7 जागा गमावल्या, शिंदेंनी मोठी चूक सुधारली; मराठवाड्यातील मतदारसंघात भाकरी फिरवली

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 23 मार्चच्या निर्देशानुसार, प्रशासनानं अशा प्रकरणांमध्ये नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मीडिया प्लॅटफॉर्मवर कारवाई सुरू केली आहे. अनेक वृत्तवाहिन्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. आतापर्यंत 170 वेबसाइट्सवरून व्हिडिओ हटवण्यात आले आहेत.

पीडितांपैकी एकाच्या नातेवाईकानं दिलेल्या माहितीनुसार, व्हिडिओ समोर आल्यानंतर त्यांना अनेक दिवस कार्यालयात जाणं टाळावं लागलं. आता पीडितेच्या कुटुंबियांकडून कामाच्या ठिकाणी वर्क फ्रॉम होमची परवानगी मागितली आहे. या घटनेमुळे संपूर्ण कुटुंब मानसिकदृष्ट्या खचल्याचं पीडितेच्या नातेवाईकांनी सांगितले आहे.

Ashok Kharat Case
Chandrakant Patil : अशोक खरातच्या मुलीच्या लग्नपत्रिकेत चंद्रकांत पाटलांचे नाव; म्हणाले, नाव टाकणं म्हणजे एक प्रतिष्ठा असते...

तसेच अशोक खरात प्रकरणातील पीडित महिलांच्या अनेक कुटुंबांना सतत चिंता आणि तणाव यांसह गेल्या काही दिवसांपासून सामाजिक दबावालाही समोर जावे लागत आहे. नातेवाईकांना सतत फोन येत आहेत, ज्यांना उत्तर देणे दिवसेंदिवस कठीण होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com