BMC mayor Race Sarkarnama
महाराष्ट्र

Mayor reservation : महापौरपदाची सोडत जाहीर; SC, ST, OBC साठी कोणत्या महापालिकेत आरक्षण? वाचा संपूर्ण यादी...

SC ST OBC Mayor Post : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे महापालिकेत अनुसूचित जमाती म्हणजेच एससीसाठी आरक्षण जाहीर झाले आहे.

Rajanand More

Civic body reservation : राज्यातील महापालिकांची निवडणूक पार पडल्यानंतर आता महापौर आरक्षणाची सोडतही जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार मुंबई, पुण्याससह सर्वच महापालिकांची आरक्षण सोडत निघाली आहे. नगरविकास खात्याच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत मंत्रालयात आरक्षण सोडत काढण्यात आली.

आरक्षण सोडतीनुसार पनवेल, इचलकरंजी, चंद्रपूर, जळगाव, अकोला, अहिल्यानगर, उल्हासनगर, कोल्हापूर या महापालिकांमध्ये OBC प्रवर्गातील नगरसेवक महापौर होईल. त्यापैकी जळगाव, चंद्रपूर, अहिल्यानगर आणि अकोल्यात ओबीसी महिलांना महापौरपदाची संधी मिळणार आहे. 

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे महापालिकेत महापौर पदासाठी अनुसूचित जाती म्हणजेच एससीसाठी आरक्षण जाहीर झाले आहे. तर जालना आणि लातूर महापालिकेतही एससी प्रवर्गातील महिलांना संधी मिळाली आहे. भाजप आणि शिवसेनेत सर्वाधिक चढाओढ असलेल्या कल्याण डोंबिवलीचे महापौरपद अनुसूचित जमातीसाठी राखीव झाले आहे.

दरम्यान, कल्याण डोंबिवलीमध्ये भाजप आणि शिवसेनेत सत्तास्थापनेसाठी जोरदार रस्सीखेच सुुरू आहे. राज ठाकरेंच्या मनसेने कालच शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला आहे. तर भाजपकडूनही इतर पक्षांच्या मदतीसाठी प्रयत्न केले जात आहेत. आता आरक्षण जाहीर झाल्याने या प्रक्रियेला वेग येणार आहे.

चंद्रपूरमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये सत्तेस्थापनेवरून चढाओढ सुरू आहे. काँग्रेस सर्वात मोठा पक्ष असला तरी बहुमतापासून दूर आहे. इथे उद्धव ठाकरेंची शिवसेना किंगमेकरच्या भूमिकेत आहे. त्यांच्या नगरसेवकांचा पाठिंबा ज्या पक्षाला मिळेल, त्या पक्षाला महापौर होईल, असे चित्र आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT