

Municipal corporation polls India : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत सध्या महापौर पदाच्या चर्चांना उधाण आले आहे. महापालिकेत भाजप-शिवसेना युतीची सत्ता आल्यानंतर आता महापौर कोण होणार, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. आरक्षणी सोडतीमध्ये एसटी प्रवर्गची चिठ्ठी निघाल्यास उद्धव ठाकरेंची लॉटरी लागणार आहे. त्यामुळे या सोडतीने युतीची धाकधूक वाढविली आहे.
मुंबईसोबत महाराष्ट्रातील इतर २८ महापालिकांमध्येही निवडणूक झाली आहे. या महापालिकांसाठीही महापौर पदाचे कोणते आरक्षण निघणार, याकडेही स्थानिक नेते डोळे लावून बसले आहे. दुसरीकडे महाराष्ट्रातील या २९ महापालिकांप्रमाणे देशातील आणखी एका महापालिकेच्या महापौर पदाच्या निवडणुकीकडे संपूर्ण देशाला उत्सुकता लागली आहे.
चंदीगढ महापालिकेच्या महापौरपदाची निवडणूक २९ जानेवारीला होणार आहे. भाजप विरूध्द आप-काँग्रेस आघाडी असा थेट सामना या निवडणुकीत होणार आहे. विशेष म्हणजे दोन्ही बाजूला प्रत्येकी १८ मतदार आहेत. या निवडणुकीत भाजपला विजय मिळवून देण्याची जबाबदारी नव्या राष्ट्रीय अध्यक्षांनी राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्याकडे सोपविली आहे.
चंदीगढ महापालिकेत दरवर्षी महापौर पदाची निवडणूक होते. मागील दोन निवडणुकांमध्ये नाट्यमय घडामोडी घडल्या होत्या. पहिल्या निवडणुकीत निवडणूक अधिकाऱ्यांनी आपच्या नगरसेवकांच्या मतपत्रिकांवर खाडाखोड केल्यास समोर आले आहे. हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेले होते. कोर्टासमोर नंतर मतपत्रिकांची मोजणी झाली अन् त्यात आपला महापौरपद मिळाले. त्यानंतरच्या निवडणुकीत आपचे नगरसेवक फुटल्याने भाजपला महापौरपद मिळाले होते.
काही दिवसांपूर्वीच आपच्या दोन नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे भाजपकडे सध्या १८ नगरसेवक झाले आहेत. आपकडे आता ११ नगरसेवक उरले आहे. निवडणुकीत सहा नगरसेवक असलेल्या काँग्रेसकडून आपला पाठिंबा दिला जाण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसच्या एका खासदारालाही या निवडणुकीत मतदान करता येणार आहे. त्यामुळे दोन्ही बाजूने १८-१८ असा आकडा सध्या आहे.
सर्वांनी मतदान केल्यास बहुमताचा आकडा १९ होतो. एखाद्या पक्षाचा नगरसेवक गैरहजर राहिला किंवा क्रॉस व्होटिंग झाले तर महापौरपदाचा निकाल लागणार आहे. आता यामध्ये कोण बाजी मारणार याकडे लक्ष लागले आहे. मागील निवडणुकीवेळीही विनोद तावडे यांच्यावर या निवडणुकीची जबाबदारी होती. त्यावेळी पक्षाला विजय मिळाला होता. आताही तावडे हा विजय खेचून आणणार का, याकडे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.