Chhagan Bhujbal sarkarnama
महाराष्ट्र

Chhagan Bhujbal : महायुतीमध्ये तणाव, छगन भुजबळांचा गोंदियाला जाण्यास स्पष्ट नकार!

Chhagan Bhujbal Mahayuti Tension : महायुतीमध्ये पालकमंत्रिपदावरून तणाव आहे. त्यातच गोंदिया जिल्ह्याच्या ध्वजरोहणाची जबाबदारी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर होती. मात्र, त्यांनी गोंदियाला जाण्यास नकार दिला आहे.

Roshan More

Chhagan Bhujbal Displeased : पालकमंत्रिपदावरून महायुतीमध्ये तणाव आहे. रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा तिढा अजून सुटला नाही. त्यातच नाशिक जिल्ह्यात स्वातंत्र्यदिनी ध्वजवंदनाचा मान न मिळाल्याने मंत्री छगन भुजबळ नाराज असून गोंदिया जिल्ह्यातील ध्वजवंदनास त्यांनी नकार दिल्याची चर्चा आहे.

गोंदियाचे पालकमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या गुडघ्याची शस्त्रक्रिया झाल्याने ध्वजवंदनाची जबाबदारी मंत्री भुजबळ यांच्यावर होती. परंतु भुजबळ यांनी तब्येतीचे कारण देत गोंदियाला जाण्यास नकार दिला. त्यामुळे भुजबळ नाराज असल्याचे बोलले जात आहेत.त.

नाशिकच्या ध्वजवंदनाचा मान मंत्री गिरीश महाजन यांना मिळाला आहे. त्यामुळे शिवसेनेचे मंत्री दादा भुसे हे देखील नाराज असून त्यांनी आपली नाराजी पक्षाच्या वरिष्ठांच्या कानावर देखील घातली आहे.

गोंदियाची जबाबदारी लोढांवर

मंत्री छगन भुजबळ यांनी गोंदियाला जाण्यास नकार दिल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यावर स्वातंत्र्यदिनी गोंदियाच्या ध्वजवंदनाची जबाबदारी टाकली आहे. मात्र, ज्येष्ठ मंत्र्यांना अपेक्षित मान मिळत नसल्याच्या चर्चा आहे. त्यामुळे महायुतीमध्ये तणाव असल्याचे बोलले जात आहे.

भरत गोगावले नाराज

रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटलेला नाही. मात्र, स्वातंत्र्यदिनी रायगड जिल्ह्याच्या ध्वजवंदनाचा मान हा मंत्री आदिती तटकरे यांना मिळाला आहे. त्यामुळे शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले नाराज आहेत. गोगावले यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीला दांडी मारत आपली नाराजी व्यक्त केल्याचे बोलेले जात आहे. रायगडच्या पालकमंत्रिपदी आपला दावा कायम असल्याचे देखील गोगावले सांगत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT