Pune BJP : निवडणुकीच्या रणांगणासाठी भाजप सज्ज! पुणे कार्यकारिणीमध्ये नव्या चेहऱ्यांना संधी; मिसाळ आऊट, मोहोळ इन!

BJP Pune Dhiraj Gate Dushyant Mohol : आगामी महापालिकेच्या निवडणुकीच्या आधी भाजपने पुणे शहर कार्यकारिणी जाहीर केली आहे. यामध्ये नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.
BJP
BJPSarkarnama
Published on
Updated on

Pune News: भाजप शहराध्यक्षपदी फेर नियुक्ती झाल्यानंतर धीरज घाटे यांनी आपली शहर कार्यकारणी जाहीर केले आहे. 22 जणांच्या या शहर कार्यकारणीमध्ये नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. 22 जणांच्या या कार्यकारणीमध्ये मागील कार्यकारणी मध्ये पदाधिकारी असलेल्या दोन जणांना संधी देण्यात आली आहे.

आगामी पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून शहराध्यक्षपदावर धीरज घाटे यांना पुन्हा संधी देण्यात आली. त्यानंतर धीरज घाटे यांच्याकडून जाहीर करण्यात येणाऱ्या शहर कार्यकारणीची प्रतीक्षा सर्वांनाच होती. या शहर कार्यकारणीमध्ये नव्या लोकांना संधी देण्यात येणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळा सुरू होत्या.

मात्र एकीकडे नव्या चेहऱ्यांना कार्यकारणी मध्ये संधी देण्यात येणार असल्याच्या चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे मात्र जुन्या कार्यकारणीतील काही लोक थेट दिल्लीला जाऊन शहराध्यक्षांप्रमाणेच आम्हाला देखील पुन्हा कार्यकारणी मध्ये संधी द्यावी अशासाठी मागणी करत सेटिंग लावण्याचा प्रयत्न केला असल्याच्या चर्चा राजकीय सुरू आहेत.

BJP
Ajit Pawar Politics : अजितदादांचा अजब न्याय, मारहाणप्रकरणी निलंबित केलेल्या सूरज चव्हाणला प्रमोशन, अंजली दमानिया संतापल्या!

22 जणांच्या कार्यकारणीमध्ये अवघ्या दोन जणांना पुन्हा संधी देण्यात आली असल्याचे पाहायला मिळत आहे. मंत्र्यांच्या निकटवर्ती असलेल्या कोथरूड आणि शिवाजीनगर मधील प्रत्येकी एक पदाधिकाऱ्याला पुन्हा नव्या कार्यकारणीमध्ये संधी देण्यात आली असल्याचं सांगितले जात आहे.

दरम्यान, या कार्यकारणीमध्ये भाजप शहर युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी दुष्यंत मोहोळ यांना संधी देण्यात आली आहे. दुष्यंत मोहोळ हे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचे पुतणे आहेत. मागील कार्यकारणीमध्ये राज्यातील मंत्री माधुरी मिसाळ यांचे पुत्र करण मिसाळ यांच्याकडे शहर युवा मोर्चाच्या अध्यक्षपदाची सूत्र होती. त्यामुळे नव्या कार्यकारणी मधून करण मिसाळ आऊट आणि दुष्यंत मोहोळ इन झाले असल्याच्या चर्चा सुरू आहेत.

या कार्यकारणीमध्ये पर्वती आणि कोथरूड परिसरातील भाजप कार्यकर्त्यांना आधीची संधी मिळाली असल्याचे देखील बोलले जात आहे. असे असले तरी एकूणच महापालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातून समतोल साधण्याचा प्रयत्न भाजपाच्या या शहर कार्यकारणीच्या माध्यमातून शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी केलाच पाहायला मिळत आहे.

नव्याने जाहीर झालेली कार्यकारणी

पुणे शहर सरचिटणीस

पुनीत जोशी, रवींद्र साळेगावकर,विश्वास ननावरे, प्रियांका शेंडगे

पुणे शहर उपाध्यक्ष

शशीधर पुरम, सचिन मोरे अर्जुन जगताप, संदीप दळवी, विठ्ठल बराटे, सुनील पांडे, मनोज खत्री, आनंद रिटे,

पुणे शहर चिटणीस

राजू परदेशी, अनिल नवले, गणेश घुले, समीर रुपदे, अनुराधा एडके, संगीता गवळी, स्मिता खेडेकर,रूपाली धाडवे

पुणे शहर युवा मोर्चा

दुष्यंत मोहोळ

महिला सह मोर्चा अध्यक्ष

मनीषा लडकत

BJP
BJP Politics : पृथ्वीराज पाटील एकटेच गेले नाहीत... उरलसी सुरली काँग्रेसच मोकळी केली, दिग्गज नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com