Rohini Khadse  Sarkarnama
महाराष्ट्र

Rohini Khadse: केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीच्या छेडछाडप्रकरणी रोहिणी खडसेंना वेगळाच संशय; म्हणाल्या...

Minister Daughter Harassment news : याप्रकरणी तीन आरोपी फरार आहेत. या आरोपींना नेमकं कोणाचे पाठबळ आहे, असा प्रश्न सतावत आहे. त्यातच आता या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी वेगळाच संशय व्यक्त केला आहे.

सरकारनामा ब्युरो

Jalagon News : केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसह काही मुलींची मुक्ताईनगर तालुक्यातील संत मुक्ताई यात्रेमध्ये छेड काढल्याचा प्रकार घडला होता. या संतापजनक प्रकारामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. रक्षा खडसेंच्या मुलीची छेड काढल्याच्या घटनेला तब्बल दहा दिवस उलटले आहेत. तरी देखील याप्रकरणी तीन आरोपी फरार आहेत. या आरोपींना नेमकं कोणाचे पाठबळ आहे, असा प्रश्न सतावत आहे. त्यातच आता या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी वेगळाच संशय व्यक्त केला आहे.

मुक्ताईनगर तालुक्यातील संत मुक्ताई यात्रेमध्ये छेड काढल्याचा हा प्रकार घडला होता. त्यानंतर पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यात आली होती. याप्रकरणी सात जणांविरोधात पोक्सोतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील तीन जणांना अटक करण्यात आली. मात्र, अद्याप उर्वरित आरोपी फरार आहेत. त्यामुळे पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (NCP) शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी राज्य सरकरला या प्रश्नावरून धारेवर धरले आहे.

जळगावात धुलिवंदन सण साजरा करण्यासाठी रोहिणी खडसे (Rohini Khadse) आल्या होत्या. यावेळी पत्रकारांनी त्यांना रक्षा खडसेंच्या मुलीची छेड काढल्याप्रकरणी विचारणा केली. त्यावर त्यांनी राज्य सरकारच्या कारभाराबाबत चिंता व्यक्त केली आहे. राज्यात गेल्या काही दिवसात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली असल्याचे रोहिणी खडसे यांनी स्पष्ट केले.

छेडछाडपप्रकरणातील या आरोपींना नेमके कोणाचे पाठबळ आहे, असा प्रश्न पडला आहे. त्यांच्यामागे नेमका कोण आका आहे ते पोलिसांनी शोधायला हवे. या प्रकरणातील आरोपीना नेमके कोणाचं तरी त्यांना पाठबळ मिळतंय म्हणूनच ते इतके दिवस फरार आहेत, असा आरोप रोहिणी खडसेंनी यांनी यावेळी प्रसारमाध्यमाशी बोलताना केला.

गेल्या काही दिवसापासून महिलांच्या सुरक्षिततेबाबत आपलं सरकार निरुत्साही आहे. महिलांच्या सुरक्षेतेकडे त्यांचं दुर्लक्ष होतंय असं मला वाटतंय.केंद्रीय मंत्र्याच्या घरातील मुली सुरक्षित नसतील तर महाराष्ट्रातील सामान्य माताभगिनींच्या सुरक्षिततेबद्दल काय बोलणार? इतकी मोठी घटना होऊनही आरोपी अद्याप फरार आहेत. त्यामुळे माझी मागणी आहे की, राज्य सरकारने कायद्याचा वचक निर्माण करावा. माझी, तुमची किंवा कोणाचीही मुलगी असली तरी तिला संरक्षण मिळायलाच हवे. ती सरकारची जबाबदारी आहे, असे रोहिणी खडसे यांनी स्पष्ट केले.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT