
Mumbai News : नुकत्याच पार पडलेल्या राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाले. या निवडणुकीत भाजपने चमकदार कामगिरी करीत १३२ जागा मिळवल्या. त्यामुळे भाजपचा कॉन्फिडन्स चांगलाच वाढला आहे. राज्यात एकीकडे भाजपला प्रचंड बहुमत मिळाले असले तरी, भाजपमधील अंतर्गत धुसफुस आता समोर येऊ लागली आहे. त्यामुळे भविष्य काळात या पक्षातील अंतर्गत कुरबुरी मिटविण्याचे आव्हान भाजपसमोर असणार आहे. भाजपच्या मंत्री पंकजा मुंडे आणि आमदार सुरेश धस यांनी एकमेकाविरोधात भाजपच्या पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केली आहे. त्यामुळे या वादावर पडदा टाकण्याचे आव्हान भाजपसमोर असणार आहे.
गेल्या काही दिवसातील बीडचे राजकारण पहिले तर येथील नेतेमंडळीतील वाद खूप जुने असल्याचे स्पष्ट आहे. पंकजा मुंडे (Pankaja Munde) आणि सुरेश धस हा जुना संघर्ष नव्याने उफाळून आला आहे. विधानसभेत पंकजा मुंडे यांनी आष्टीत बंडखोर उमेदवार भीमराव धोंडेंचा प्रचार केल्याचा आरोप धस यांनी केला. तर मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात सुरेश धसांनी विनाकारण आपली बदनामी केल्याचे म्हणत पंकजा यांनी पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केली.
मुंडे कुटुंबासोबत सोबत कधी जिव्हाळ्याचं तर कधी विरोधाचं नातं ठेवणाऱ्या सुरेश धस (Suresh Dhas) यांच्याविरोधात पंकजा मुंडे आक्रमक झाल्याचे पाहवयास मिळत आहे. दोघेही संधी मिळताच एकमेकांवर टीका करण्याची संधी सोडत नसल्याने यतेय काळात हा वाद आणखीनच चिघळण्याची शक्यता आहे. भाजपमधील पंकजा मुंडे आणि सुरेश धस या दोन नेत्यांमधला बेबनाव गेल्या चार महिन्यापासून चव्हाट्यावर आला आहे. विधानसभेपासून सुरु असलेली दोन नेत्यांमधली धुसफूस संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर अधिक तीव्र झाली आहे. त्यामुळे दोन्ही नेते कोणतीही भिडभाड न बाळगता एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत.
आता हा वाद भाजप पक्षश्रेष्ठींच्या दरबारात गेला आहे. पंकजा मुंडे आणि सुरेश धस दोघांनीही एकमेकांच्या विरोधात पक्षश्रेष्ठींकडे धाव घेतली आहे. त्यामुळे आता भाजप हायकमांड या वादावर कसा तोडगा काढणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आमदार धस यांनी पंकजा मुंडे यांच्यावर विधान सभेला पक्षविरोधी भूमिका घेतली असा आरोप केला होता. त्यावर पंकजा मुंडे यांनी मी प्रचार केलाय की नाही तुम्ही रेकॉर्डवर जाऊन पहा. या राज्यात अनेक लोक भाजपशी निगडीत होते, ते अपक्ष उभे राहिले. त्यांच्या मंचावर जाऊन मतदानाची मी विनंती केलेली आहे. त्यांनी केलेला आरोप चुकीचा असल्याचे सांगत त्यांनी असा आरोप करायला नको होता, असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.
पंकजा मुंडेंनी एका मुलाखतीप्रसांगी धसावर टीका केली होती. धनंजय मुंडे बीडचे पालकमंत्री असताना गेल्या तीन वर्षात धसांनी कराड गँगविरोधात आवाज का उठवला नाही ? असा प्रश्न मुलाखतीतून उपस्थित केला होता. सोबतच आपण भाजपच्या राष्ट्रीय नेत्या असूनही धस आपल्यावर थेट आरोप कसे करतात याबद्दल आक्षेप घेतला. त्यानंतर या दोघामध्ये वादाची ठिणगी पडली. त्यानंतर दोन्ही नेत्यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील राजकारणाचा उल्लेख केला आणि भाजपामध्ये एकमेकांवर करीत असलेले कुरघोडीचं राजकारण उघड झाले आहे.
आमदार धस हे पंकजा मुंडे यांचे नाव घेऊन टीका करतायत, त्यांच्या या भूमिकांमुलळे भाजप पक्षाच्या भूमिकेला ठेच पोहचत आहे. ते करीत असलेल्या टीकेनंतर मी गेली चार-पाच महिने गप्प बसले, पण आता पक्षश्रेष्ठींना विनंती केली आहे की, धस यांना समज द्यावी, असेही पंकजा मुंडे यांनी सांगितले आहे.
बीडमधील भाजपचे दोन नेते आता जाहीरपणे एकमेकांच्या विरोधात टीका करीत आहेत. त्यामुळे देशमुखांच्या हत्याप्रकरणामुळे बीड सध्या राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या संवेदनशील जिल्हा झाला आहे. त्यामुळे या दोन नेत्यांमधला वाद आणि नाराजी भाजप श्रेष्ठी कशी दूर करणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.