Mangal Prabhat Lodha Sarkarnama
महाराष्ट्र

Mangal Prabhat Lodha : राज्यातील 14 आयटीआयचं नामांतर; मुख्यमंत्री शिंदेंच्या ठाण्यातील आयटीआयला दिलं 'हे' नाव

Pradeep Pendhare

Mumbai News : विधानसभा निवडणुका जशा जवळ येऊ आल्या आहेत, तसे महायुती सरकार वेगवेगळे लोकप्रिय निर्णय घेण्यावर भर दिला आहे. भाजप नेते तथा राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी महत्त्वाचे निर्णय घेतलेत.

राज्यातील 14 आयटीआयचे नामांतर करण्यात येणार असून, त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील आयटीआयला धर्मवीर आनंद दिघे यांचे नाव दिले आहे.

विधानसभा निवडणुका (Election) कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकतात. केंद्रीय निवडणूक आयोगाचे पथक 27 आणि 28 सप्टेंबरला महाराष्ट्र राज्याच्या दौऱ्यावर येत असून, पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यापार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. महाविकास आघाडी, महायुती, तिसरी आघाडी आणि मनसेसारखे स्वतंत्र निवडणूक लढण्याची तयार करत असणारे पक्षांनी राज्यातील राजकीय समीकरणं जुळवण्याच्या बैठका, दौरे वाढवले आहेत. यात महायुती सरकार देखील सर्वच बाबतीत आघाडीवर आहे.

महायुती सरकारमधील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्मयंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केली. ही योजना लोकप्रिय ठरली असून, त्यात आणखी लोकप्रिय घोषणांचा सपाटा महायुती सरकारच्या इतर विभागानं लावला आहे. भाजप नेते तथा कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी राज्यातील 14 आयटीआयच्या नामांतराची घोषणा केली आहे.

भाजप नेते मंगलप्रभात लोढा यांनी सामाजिक आणि जातीय समीकरणांचा विचार केला आहे. सहाजिक यामागे विधानसभा निवडणुकीतीय जातीय मतांच्या फायद्याकडे पाहिलं गेलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यातील आयटीआयला धर्मवीर आनंद दिघे यांचे नाव देण्यात आलं आहे. तसंच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिकलेल्या एल्फिन्स्टन महाविद्यालयातील आयटीआयला बाबासाहेबांचे नाव दिलं गेलं आहे. कोल्हापूरच्या आयटीआयला शाहू महाराजांचे आणि बीडच्या आयटीआयला विनायक मेटेंचे नाव दिलं गेले आहे.

नामांतराचा धडका

केंद्रात आणि राज्यात महायुती सरकार आल्यापासून राज्यातील जिल्हा, संस्थांच्या नामांतराचे प्रयोग होत आहे. औरंगाबाद जिल्ह्याचं छत्रपती संभाजीनगर नामांतर करण्यात आलं. अहमदनगर जिल्ह्याचं पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगर नामांतर करण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात आला आहे. तसंच अहमदनगरमधील ब्रिटीश कालीन रेल्वे स्टेशनचं नाव 'अहिल्यानगर' करण्यात आलं आहे. आता राज्यातील 14 आयटीआयचे मंगलप्रभात लोढा यांनी नामांतर केलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT