Nana Patole : महायुतीमध्ये फूट पडणार? नाना पटोलेंनी दिले संकेत

Nana Patole conflict in mahayuti : माझ्यासाठी महाराष्ट्रातील शेतकरी आणि तरुण महत्त्वाचा आहे. मुख्यमंत्री मी होणार की नाही हे आत्ताच सांगता येणार नाही, असे नाना पटोले म्हणाले.
Nana Patole
Nana PatoleSarkarnama
Published on
Updated on

Nana Patole : उपमुख्यमंत्री अजित पवार यांना एकटे पाडले जात असल्याचा दावा ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केला होता. या दाव्याला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील पुष्टी देत महायुतीत महाभारत सुरू आहे. मी अनेक दिवसांपासून हेच सांगत आहे. पुढे काय होते ते बघा,असे म्हणत युती तुटणार असल्याचेही संकेत पटोलेंनी दिले आहेत.

महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रिपदावरून तीनही पक्ष दावा करीत आहे. यावर पटोले म्हणाले, 'प्रत्येकच पक्षाच्या कार्यकर्त्यांना आपला नेता मुख्यमंत्री व्हावा असे वाटत असते. त्यात कोणी वाईट वाटून घ्यायचे कारण नाही. मात्र आमचा मुख्यमंत्री विधानसभेच्या निवडणुकीत ठरले. आघाडीतील तीनही पक्ष यावर बैठक घेऊन निर्णय करतील.'

नाना पटोले मुख्यमंत्री होणार?

'मी नशिबावर नव्हे तर कर्मावर विश्वास ठेवतो. माझ्यासाठी महाराष्ट्रातील शेतकरी आणि तरुण महत्त्वाचा आहे. त्यांना वाचवणे हे आपले काम आहे. मुख्यमंत्री मी होणार की नाही हे आत्ताच सांगता येणार नाही', असे पटोले यांनी स्पष्ट केले.

Nana Patole
Sharad Pawar : 'वस्तादा'ची साथ सोडलेले दोन्ही दिग्गज नेते अडकले चक्रव्यूहात

नागपूरमधील मतदारसंघांवर दावा?

नागपूर शहरातील 6 विधानसभा मतदारसंघ काँग्रेस मेरिटवर मागत आहे. जागा मागायच्या म्हणून आम्ही मागत नाही. सध्या प्राथमिक चर्चा सुरू आहेत. प्रत्येक पक्ष आपला दावा करीत आहे. हा काही तिढा नाही. सामोपचाराने सर्व प्रश्न सोडवू.

आधी भाजप आणि महायुतीचा पराभव करणे आमचे उद्धिष्ट्य आहे. भाजपने सरकारची प्रतिमा मलीन केली आहे. लोकांनाही आता पश्चाताप होत आहे, असे पटोले म्हणाले.

भाजपला परिणाम भागावे लागणार

भाजपने खोके देऊन शिवसेना फोडली, त्यामुळे वाद उद्भवणार होतेच. खोक्यांच्या लोकांमध्ये भांडणे सुरू आहेत. खोक्याची व्यवस्था निर्माण करण्यात भाजपचा मोठा हात आहे. संसदीय व्यवस्था, लोकशाही व्यवस्था भाजपने संपवली आहे. याचे परिणाम आता भाजपला भोगावे लागणार असल्याचा इशारा देखील पटोले यांनी दिला आहे.

Nana Patole
 Arvind Kejriwal : ...तोपर्यंत केजरीवालांची खुर्ची रिकामी राहणार! मुख्यमंत्री आतिशी यांची पहिल्याच दिवशी मोठी घोषणा

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com