Sunil Tatkare, Tanaji sawant  Sarkarnama
महाराष्ट्र

Tanaji Sawant Vs NCP : तानाजी सावंतांना तटकरेंनी हलक्यातच काढलं...

सरकारनामा ब्युरो

Mumbai News : विधानसभा निवडणुका तोंडावर असल्याने वातावरण आतापासूनच तापण्यास सुरुवात झाली आहे. सत्ताधारी व विरोधक एकमेकांवर आरोप करीत असतानाच महायुतीतील धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. तानाजी सावंत यांनी केलेल्या वक्तव्यानंतर त्यांच्यावर अजित पवार गटाकडून जोरात हल्लाबोल केला जात आहे. कोण तानाजी सावंत मी त्यांना ओळखत नाही, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी टीका केली आहे.

प्रसार माध्यमांशी संवाद साधताना सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी सावंत यांच्या विधानातील हवाच काढली आहे. त्यांना विचारून आम्ही एनडीएमध्ये सहभागी झालो का? केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, पीएम नरेंद्र मोदी यांच्यासोबत चर्चा करून आम्ही सत्तेत सहभागी झालो होतो. त्यामुळे महायुतीमध्ये खडा टाकणाऱ्यांवर बोलणार नाही. याबाबत काय आहे तो एकनाथ शिंदे (Ekanath Shinde) निर्णय घेतील, असेही तटकरे यांनी स्पष्ट केले.

आगामी काळात महायुतीचे एकत्रित दौरे, जिल्हा तालुका स्तरावरील दौरे याबाबत देखील चर्चा झाली आहे. 288 जागांवर आम्ही महायुती म्हणुनच सामोरे जाणार आहोत. आम्ही एकत्रित हा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.

त्यासोबतच सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या लोकांना दूधवाल्याची किंमत काय कळणार त्यांना त्याच्या विषयी आत्मीयता देखील वाटणार नाही. यशवंतराव चव्हाणांच्या विचारांचे आम्हीच पाईक आहोत, असे वाटणाऱ्यांची भाषा काल आपण ऐकली आहे, असे म्हणत त्यांनी सुप्रिया सुळे यांचे नाव न घेता टीका केली.

हर्षवर्धन पाटील यांनी घेतलेल्या मेळाव्यात काय झाले याची माहिती नाही. रात्री आम्ही वरिष्ठ नेते एकत्र बसलो होतो. ताकदीने निवडणुकांना सामोरे जाण्याचा निर्णय घेतला आहे. एखाद्या दुसऱ्या मतदारसंघात वाद होतं असतात, त्यामुळे ते सोडविण्याचा प्रयत्न असणार असल्याचे त्यांनी सांगितले.

रोहित पवार यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी जगातील सर्व अक्कल आपल्यालाच आहे, असे त्यांना वाटते. तुम्ही त्यांची ऐतिहासिक यात्रा पाहिली असेल ज्याला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. सुनेत्रा पवार यांच्यावर सुप्रिया सुळे यांनी केलेल्या टीकेबाबत त्यांना विचारले असता ते म्हणाले, 'महिलाबाबत त्या काय बोलतात हे देखील आपण पाहिले आहे. आमच्या यात्रेला अभुतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे सुप्रिया सुळे यांना नैराश्य आले असल्याचे तटकरे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT