Maharashtra Politics : तृणमूल काँग्रेसचे खासदार फुटल्याने महाराष्ट्राच्या राजकारणाच देखील हादरा बसला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अॅक्टिव्ह झाले असून दिल्लीत नुकतीच त्यांनी बैठक घेत ठाकरेंचे सात खासदार फोडण्याची तयारी सुरू केल्याची चर्चा आहे.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील देखील खासदार फोडण्याची चर्चा शिवसेनेकडून करण्यात आली होती. ऑपरेशन 'तुतारी'चा उल्लेख शिवसेनेच्या नेत्यांकडून केला जात होता. महाराष्ट्रातून तब्बल 12 खासदार फुटण्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू होती. मात्र, शरद पवारांचे खासदार फुटणार नसल्याचे स्पष्ट झाल्याने ऑपरेशन तुतारीला ब्रेक लागला होता.
तृणमूल काँग्रेसमध्ये पडलेली फूट पाहता पुन्हा महाराष्ट्रात 'मिशन 12' अॅक्टिव्ह होणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. मात्र, गेल्या दहा महिन्यांपासून सुरू असलेल्या चर्चांनंतर ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी सावध आहे. प्रत्येक खासदार त्यांच्या पक्षाच्या संपर्कात असल्याचे सांगितले जात आहे.
मागील काही महिन्यांपासून प्रत्येक खासदारकडे पक्षाचे बारकाईने लक्ष आहे. त्यांच्या अडअडचणी समजून घेतल्या जात आहेत. तृणमूलमधील बंडखोरीनंतर महाराष्ट्र असे काही घडणार नसल्याचे कार्यकर्ते खासगीत बोलत आहेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये सर्व सेफ आहे. मात्र, ठाकरेंच्या शिवसेनेला खिंडार पाडण्यासाठी शिंदे प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे.
मराठी वृ्त्तपत्र पुढारीने दिलेल्या वृत्तीनुसार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी रविवारी (सात जून) ठाकरेंच्या खासदारांची बैठक दिल्लीत घेतली. या गुप्त बैठकीत सात खासदारांना सोबत घेण्यात त्यांना यश आले आहे. मराठवाड्यातील खासदाराला मंत्रिपद देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. दरम्यान, या सर्व शक्यता संजय राऊत यांनी फेटाळल्या आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.