Maharashtra Politicse : महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप, उद्धव ठाकरेंचे सात खासदार फुटणार, मंत्रिपदाची डील फायनल; एकनाथ शिंदेंची गुप्त बैठक

Uddhav Thackeray Vs Eknath Shinde : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसणार असल्याची चर्चा आहे. तब्बल सात खासदार एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याच्या तयारीत असून दिल्लीत गुप्त बैठक पार पडल्याची माहिती आहे.
Eknath Shinde's reported closed-door meeting in Delhi has fueled discussions about a possible defection of MPs from Uddhav Thackeray's faction.
Eknath Shinde's reported closed-door meeting in Delhi has fueled discussions about a possible defection of MPs from Uddhav Thackeray's faction.sarkarnama
Published on
Updated on

Shivsena Politics : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड घडत आहे. ऑपरेशन टायगर अ‍ॅक्टिव्ह झाले असून उद्धव ठाकरेंचे तब्बल सात खासदार फूटण्याच्या तयारी आहेत. रविवारी (ता.7) दिल्लीत गुप्त बैठक पार पडली. या बैठकीत सर्व प्लॅन तयार करण्यात आला आहे.

पूर्वी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या दिल्लीतील बंगल्यात गुप्त बैठक पार पडली. मात्र, त्यानंतर फोडाफोडी तुर्तासा नको, असे भाजपकडून सांगण्यात आले होते. मात्र, आत रविवारी (ता,७) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ठाकरेंच्या खासदारांची गुप्त बैठक घेतली, असे वृत्त पुढारी दैनिकाने दिली आहे.

9 पैकी सात खासदार हे शिंदेंच्या शिवसेनेत जाण्यास तयार असून एकाला केंद्रात मंत्रिपद मिळणार आहे. मराठवाड्यातील खासदारला ही संधी मिळणार असल्याची चर्चा आहे. जे दोन खासदार शिंदेंसोबत जाण्यास तयार नाहीत ते मुंबईतील असल्याची देखील माहिती आहे.

Eknath Shinde's reported closed-door meeting in Delhi has fueled discussions about a possible defection of MPs from Uddhav Thackeray's faction.
Operation Tiger Returns? : 'ऑपरेशन टायगर'चं मला काहीच माहिती नाही; शिंदे भेटीवर ठाकरेंच्या शिलेदाराचं ‘मौनं सर्वार्थ साधनम्’, वाढवलं राजकीय टेन्शन

खासदाराचे सूचक मौन

ठाकरेंचे खासदार शिंदेंच्या संपर्कात असल्याचे वृत्त समोर आल्यानंतर शिर्डीचे ठाकरेंचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना माध्यम प्रतिनिधींनी या विषयी प्रश्न विचारला. मात्र, हात जोडत ते म्हणाले, यावर प्रश्न विचारू नका. ‘मौनं सर्वार्थ साधनम्’ असे म्हटले. या चर्चांचे त्यांनी खंडन न करता सूचक मौन बाळगल्याने ठाकरेंचे खासदार फूटणार या चर्चांना आणखी हवा मिळाली आहे.

त्या बातम्या खोट्या...

संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, ठाकरेंचे खासदार फुटणार आहेत, भाजपच्या संपर्कात आहेत अशा बातम्या पसरवल्या जाणार आहेत, या हे सर्व अफवा आहे. ९ पैकी १० किंवा ११ खासदार फुटणार असल्याच्या बातम्या पसरवल्या जात आहेत. मात्र कोणीही कुठे जाणार नाही. ज्यांना जायचं होतं ते आधीच गेले आहेत. आता सर्व खासदार पक्षासोबत भक्कमपणे उभे आहेत, असे संजय राऊत यांनी सांगितले.

Eknath Shinde's reported closed-door meeting in Delhi has fueled discussions about a possible defection of MPs from Uddhav Thackeray's faction.
Maharashtra Politics : मोठ्या पक्षाला खिंडार, सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्षाने हाती घेतले 'घड्याळ'!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com