Jitendra Awhad
Jitendra Awhad Sarkarnama
महाराष्ट्र

Jitendra Awhad : 2002 मध्ये राष्ट्रवादी फोडण्याचा प्रयत्न; पवारसाहेबांना गुप्तहेरांकडून बातमी अन्...

Pradeep Pendhare

Ahmednagar News : शरद पवार यांनी काँग्रेस सोडली नव्हती. त्यांना पक्षातून बाहेर काढण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी 1999 साली राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन केली. यानंतर 2002 मध्ये पक्ष फोडण्याचा प्रयत्न झाल्याचा गौप्यस्फोट पक्षाचे प्रवक्ते जितेंद्र आव्हाड यांनी केला.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा वर्धापनदिन नगरमध्ये झाला. यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी शरद पवार यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्ष 2002 मध्ये फोडण्याचा प्रयत्न झाल्याचे सांगितले. हा प्रयत्न कोणी केला, कसा केला याच्या खोलात आपण जाणार नाही. पण पवारसाहेबांना त्यांच्या गुप्तहेरामार्फत बातमी समजली आणि त्यांच्या हाती त्यावेळी अनेक तरुण कार्यकर्ते आणि माझ्यासारखे आमदार लागले, असे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.

शरद पवार (Sharad Pawar) यांच्या या वयातील राजकीय वाटचालीवर जितेंद्र आव्हाड यांनी कौतुक केले. वय झाले म्हणून जे घराबाहेर काढायला निघाले होते, त्यांचेच वय आता दिसू लागले आहे. पण त्यांना काय माहित भाग्य कधी झोपत नसते. पुढे काय होते, त्याची वाट पाहावी लागले. शरद पवारसाहेब नेहमीत तेच करतात. संकट घाबरट असतात, हे शरद पवारसाहेबांना चांगले माहित आहे. संकटं ही सामूहीक हल्ले करतात. ती कशी परतावी, याचा रामबाण उपाय म्हणजे शरद पवार, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले.

जितेंद्र आव्हाड यांनी संविधान बदलण्याच्या गोष्टीवर भाष्य करता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे पुन्हा भाष्य केले. जेव्हा संविधान बदलेले जाईल, तेव्हा देशात दोन नागरिकत्व येतील. यात गरिबांना खालचे नागरिकत्व असेल, असे सांगितले. मनुस्मृतीचे अभ्यासक्रमात चार श्लोक घ्यायचे आहे, यातून यांचा विचार काय आहे, हे लक्षात येते. शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी मनुस्मृतीबाबत हिंट दिली आहे. हीच हिंट अमित शाह यांनी पूर्वीच दिली होती. मनुस्मृतीत अनेक घाणेरड्या गोष्टी लिहून ठेवल्या आहेत. ती आम्हा बहुजनांना मान्य नाही, असेही जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT