Nilesh Lanke : खासदार लंकेंना राजभवनात सोडतील का? शशिकांत शिंदे म्हणाले, "पंतप्रधान मोदी देखील..."

Sharad Pawar, Nilesh Lanke And Shashikant Shinde Politics : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा वर्धापनदिन नगरमध्ये शरद पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे यांच्या उपस्थित झाला. यावेळी शशिकांत शिंदे यांनी महाराष्ट्रात पक्ष संघटनेची जाबाबदारी मागितील आहे.
Sharad Pawar, Nilesh Lanke And Shashikant Shinde
Sharad Pawar, Nilesh Lanke And Shashikant Shindesarkarnama

Ahmednagar News : सातारा मतदारसंघात भाजपशी कडवी झुंज देणारे शशिकांत शिंदे यांनी खासदार नीलेश लंके यांच्याविषयी वर्धापनदिनात हशा पिकवणारी टिप्पणी केली. "खासदार नीलेश लंके यांची शरीरयष्टी पाहिल्यावर त्यांना राजभवनात सोडतील का? यावर कार्यक्रमात चर्चा रंगल्याचे सांगून नीलेश लंकेंची एवढी प्रसिद्धी झाली आहे की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील त्यांना ओळखतील", अशी जाहीर टिप्पणी शशिकांत शिंदे यांनी करताच हशा पिकला.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाचा वर्धापन होत आहे. या वर्धापनदिनाला राज्यभरातील कार्यकर्ते, पदाधिकारी आले आहेत. तसेच नवनिर्वाचित खासदार देखील सहभागी झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट मुंबईत वर्धापनदिन घेत असतानाच, शरद पवार यांनी मात्र नगरमध्ये कार्यक्रम घेतला. या सभेत सातारा मतदारसंघातून भाजपशी कडवी झुंज देणारे शशिकांत शिंदे यांनी चांगलीच टोलेबाजी केली.

शशिकांत शिंदे यांनी म्हटले की, "विधानसभा निवडणुकीत पक्षाला चांगलेच यश मिळाले पाहिजे. यासाठी राज्यात शरद पवार यांच्या विचाराची सत्ता आली पाहिजे. महाविकास आघाडीमध्ये आपल्याबरोबर उद्धव ठाकरे आणि काँग्रेस (Congress) असणारच आहे". परंतु पक्षाला राज्यात चांगले यश मिळावे यासाठी या कार्यकर्त्यावर महाराष्ट्रातील जाबबादारी द्या, अशी मागणी केली.

Sharad Pawar, Nilesh Lanke And Shashikant Shinde
Sharad Pawar And Nilesh Lanke : शरद पवार जाम खूष; आमदार जगतापांना जमलं नाही ते, लंकेंनी करून दाखवलं...

'मी लढवय्या कार्यकर्ता आहे. शरद पवारसाहेबांनी कसे लढायचे हे सांगितले आहे. कडवी झुंज दिली. थोडा कमी पडलो. पण मी माझ्यासाठी नेत्यासाठी लढलो आहे. तुतारी आणि पिपाणीमधल्या फरकाने हरलो. पण पराभवला घाबरत नाही. शरद पवारांचा पठ्ठ्या आहे. अतृप्त आत्मा म्हणत होते. आता या आत्म्याने आज अनेकांना शांत बसवले आहे', असा टोला शशिकांत शिंदे यांनी विरोधकांना लगावला.

महाराष्ट्राची जबाबदारी मागितली

शरद पवार यांच्याकडे महाराष्ट्रात पक्षाची जबाबदारी द्यावी, अशी मागणी शशिकांत शिंदे यांनी वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात जाहीरपणे मागितली. शशिकांत शिंदे यांच्या या मागणीवर शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील काय निर्णय घेतात, याकडे लक्ष आता लागले आहे.

Sharad Pawar, Nilesh Lanke And Shashikant Shinde
Nashik Teacher Constituency : नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणुकीतील उमेदवार किशोर दराडेंचे अपहरण की बेपत्ता?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com