Rohit Pawar VS ED : बारामती अॅग्रो कंपनीतील कथित गैरव्यवहार प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांची ईडीने चौकशी केली होती. आता महाराष्ट्र राज्य सहकारी बँक (एमएससीबी) कथित गैरव्यवहाराप्रकरणी ईडीकडून रोहित पवार यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. आरोपपत्र दाखल झाल्यानंतर रोहित पवार यांनी ट्विट करत आपण संघर्षाला तयार असल्याचे म्हटले आहे.
रोहित पवार म्हणाले की, 'कुणाचं आणि काय ऐकलं नाही म्हणून माझ्याविरोधात ईडीने कारवाई केली हे जगजाहीर आहे, याबाबत अधिक सांगण्याची गरज नाही. ईडीचे अधिकारी बिचारे आदेशाचे धनी, त्यांनी केवळ आलेल्या आदेशाचं पालन केलं आणि आता आरोपपत्रही दाखल केलं.'
आपल्या सोशल मीडियावरील पोस्टमध्ये रोहित पवारांनी म्हटले आहे की, तपास पूर्ण झाला असून ज्याची आपण वाट बघत होतो त्या निर्णयाचा चेंडू आता न्यायव्यवस्थेच्या कोर्टात आहे. कारण न्यायदेवतेवर माझा पूर्ण विश्वास असून यामध्ये ‘दूध दूध आणि पाणी का पाणी’ होईलच…!
'विचारांसाठी कितीही संघर्ष करावा लागला तरी माझी तयारी आहे. महाराष्ट्राने लाचारीला आणि फितुरीला कधीही थारा दिला नाही आणि संघर्षालाच डोक्यावर घेतलंय, हा इतिहास आहे.', असे म्हणत रोहित पवार यांनी आपल्या सोशल मीडियावरील पोस्टमध्ये सत्यमेव जयते, जय संविधान असे हॅशटॅग देखील वापरले आहेत.
ईडीकडून 24 जानेवारी 2024 मध्ये पहिल्यांदा चौकशी करण्यात आली होती. तब्बल 12 तास ही चौकशी सुरू होती. त्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या आधी त्यांना 1 फेब्रुवारीला दुसऱ्या चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. तेव्हा देखील त्यांची साडेआठ तास चौकशी करण्यात आली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.