Rohit Pawar  Sarkarnama
महाराष्ट्र

Rohit Pawar : 'धोरण व्हायला सव्वा वर्ष लागलं'; आमदार पवारांनी महायुती सरकारच्या गतिमान कारभाराला डिवचलं

MLA Rohit Pawar sharp attack on the decision to ban five toll booths in Mumbai : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुंबईतील टोल नाके बंद करण्याच्या निर्णयावर आमदार रोहित पवारांनी करून दिली मोठी आठवण.

Pradeep Pendhare

Mumbai News : मुंबईतील प्रमुख पाच टोल नाके बंद करण्याच्या निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला. या निर्णयाचे सर्वच महाराष्ट्रातून स्वागत होत आहे. मनसेने आनंद व्यक्त केला आहे, तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आठवले गटाने मुंबईत पेढे वाटले आहे.

यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवारांनी महायुती सरकारच्या गतिमान कारभारावर बोटं ठेवत डिवचलं आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी देखील राज्य मंत्रिमंडळांमधील निर्णयावरून टोलेबाजी केली आहे.

मुंबईतील (Mumbai) प्रमुख पाच टोल नाके बंद करण्याच्या निर्णयावरू आमदार रोहित पवार यांनी 'एक्स' माध्यमांवर पोस्ट शेअर केली आहे. याच महायुती (Mahayuti) सरकारच्या गतिमान कारभाराला खोचक टोला लगावला आहे. 'मुंबईत प्रवेश करताना टोलनाक्यांवर 'एमएसआरडीसी'कडून होत असलेली बेकायदेशीर वसुली थांबवण्याचा निर्णय शेवटच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत का होईना, घेतल्याबद्दल सरकारचे आभार', रोहित पवार यांनी मानले आहेत.

आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी या टोल संदर्भात पावसाळी अधिवेशनात आठवण करून दिली होती. "हे रस्ते महापालिकेकडे हस्तांतर केले, असल्याने ही अवैध टोल वसुली थांबवण्यासंदर्भात प्रश्न विचारला होता. यावर धोरण तयार होत असल्याचं उत्तर मंत्र्यांनी दिलं होतं. पण धोरण तयार व्हायला सव्वा वर्ष उलटलं आणि शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीचा मुहुर्त लागला हे, मात्र अनाकलनीय आहे", असे रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

टिंगल टवाळी सुरू आहे

मंत्रिमंडळातील निर्णयांवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी खोचक टीका केली. राज्याची टिंगल टवाळी सुरू आहे. प्रत्येक जाती आणि उपजातीला महामंडळ हा राज्य तुम्हाला जातीपातीत पडायचा आहे का? मतांसाठी तुम्ही किती महामंडळ तयार करणार? असा सवाल केला आहे. हे सरकार सायंकाळपर्यंत दहा हजार निर्णय घेतली. तसा विक्रमच करायचा आहे. इतका खोटारडं सरकार गेल्या दहा हजार वर्षात झालेले नाही. एकनाथ शिंदे यांचे सरकार महाराष्ट्राला कलंक आहे, असा टोला देखील संजय राऊत यांनी लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT