Rohit Pawar Sarkarnama
महाराष्ट्र

Rohit Pawar : राज्याच्या उधारीचा आकडा किती? आमदार रोहित पवारांचे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना टोमणे

MLA Rohit Pawar Criticized the Unplanned Governance of the State Government: राज्य सरकारच्या नियोजनशून्य कारभारामुळे राज्याच्या उधारीचा आकडा वाढला असून, आमदार रोहित पवारांनी नियोजनशून्य कारभाराकडे लक्ष वेधलं आहे.

Pradeep Pendhare

Mumbai News : राज्यातील महायुती सरकारच्या नियोजनशून्य कारभाराचे वाभाडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी काढले आहेत. राज्य सरकारच्या उधारीचा आकडा सांगताना, उद्या पगार थांबतील, असे भाकीत वर्तवलं आहे.

तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत असलेल्या अर्थ खात्याचं नेतृत्व करत असताना राज्यावर दिवाळखोरीची परिस्थिती ओढवणं हे देखील आश्चर्याचं आहे, असा देखील टोमणा आमदार रोहित पवार यांनी लगावला.

विधानसभा निवडणुकांची कधीही घोषणा होईल. विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांची उणीधुणी काढण्यात व्यग्र आहे. आमदार रोहित पवारांचे महायुती सरकारवर दिवसेंदिवस 'सोशल' हल्ले वाढवले आहेत. राज्याच्या आर्थिक परिस्थितीवर त्यांनी 'एक्स' खात्यावर लक्षवेधी पोस्ट केली आहे. ही करताना त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोमणे लगावले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (NCP) शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी राज्यातील प्रमुख तीन सत्ताधाऱ्यांना राज्याच्या आर्थिक परिस्थितीवरून सुनावलं आहे. बंडखोर आमदारांना सांभाळण्यासाठी तसेच दलालीसाठी सरकारने कुठल्याही आर्थिक बाबींचा विचार न करता दणादण टेंडर काढले. परिणामी जून महिन्यात असलेली विकासकामांच्या रखडलेल्या बिलांची 18 हजार कोंटीची उधारी आता तब्बल 40 हजार कोटींवर पोचल्याकडे आमदार पवारांनी लक्ष वेधले.

'लॉलीपॉप'च म्हणावे लागले

राज्य सरकारची उधारी बघता सरकार सध्या करत असलेल्या वेगवेगळ्या विकासकामांच्या घोषणा म्हणजे, निवडणुका समोर ठेवून दाखवण्यात येत असलेले 'लॉलीपॉप'च म्हणावे लागले, असा टोला आमदार पवारांनी लगावला आहे. यावेळी उपमुख्यमंत्री रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांना देखील टोमणा लगावला आहे.

राज्याची वाटचाल दिवाळखोरीकडे

या दोघा उपमुख्यमंत्र्यांना अर्थखात्याचा दीर्घ अनुभव आहे. अजितदादांना अर्थखात्याचा दीर्घ अनुभव आहे. त्यांच्या फाईल चेक करणारे देवेंद्र फडणवीस यांची जोडी अर्थखात्याचे नेतृत्व करत असताना राज्यावर दिवाळखोरीची परिस्थिती ओढवत आहे, याचे आश्चर्य आमदार रोहित पवारांनी व्यक्त केले. एकंदरीत सरकारच्या नियोजनशून्य कारभारामुळे राज्याची दिवाळखोरीकडे वाटचाल सुरू आहे. आजत बिले थांबली आहे, उद्या बगार थांबतील, अशी भीती देखील आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT