Political Horoscope Shivsena : वाटचाल शिवसेनेची, काय सांगते स्थापनपत्रिका...

Bhavishyanama 5 to 11 Oct : याशिवाय पाहूयात भविष्यनामा ५ ते ११ ऑक्टोबर २०२४ काय सांगतोय?
Shivsena
ShivsenaSarkarnama
Published on
Updated on

-सिद्धेश्वर मारटकर

आज आपण शिवसेना स्थापना पत्रिकेचा विचार करणार आहोत. शिवसेना स्थापना (१९ जून १९६६) स्थापना पत्रिकेत धनु लग्न, मिथुन रास असून, रवीचंद्र बुध गुरू मिथुन राशीत असल्यामुळे मराठी राशीत असल्यामुळे मराठी भाषा व मराठी भाषिक स्थानिकांच्या प्रश्‍नांसाठी लढणारा पक्ष म्हणून शिवसेनेची ओळख आहे. प्रबोधनकार ठाकरे यांच्या मार्गदर्शनातून बाळासाहेब ठाकरे यांनी पक्षाची स्थापना केली.

धनू लग्नावर गुरूची दृष्टी असल्यामुळे प्रखर हिंदुत्वाची विचारधारा या पक्षाची प्रमुख भूमिका राहिली आहे. २० टक्के राजकारण आणि ८० टक्के समाजकारण ही भूमिका पक्षाची राहीली आहे. कामगार वर्ग, कष्टकरी वर्ग, स्थानिकांच्या प्रश्‍नावर कायम आंदोलने करून सत्ताधारी पक्षाला धारेवर धरण्याचे काम केल्याने या वर्गातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने महाराष्ट्रभर कार्यरत आहेत. सप्तमातील द्विस्वभाव राशीत बुध-गुरू असल्याने हिंदुत्वाच्या समान विचारधारा असणाऱ्या भारतीय जनता पक्षाबरोबर(BJP) युती करून १९९४ साली प्रत्यक्ष सत्तेमध्ये सामील होऊन मनोहर जोशींच्या नेतृत्वाखाली भाजप-सेना युतीचे सरकार स्थापन झाले व शिवसेनेचा पहिला मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभला.

Shivsena
ShivsenaSarkarnama

आघाडी-युतीच्या राजकारणाशिवाय पर्याय नसल्यामुळे सत्तेसाठी भाजपबरोबर युती पक्षासाठी सत्तेपर्यंत जाण्यासाठी पोषक ठरली. मात्र, पुढील काळात तत्कालीन लहान भाऊ असलेल्या भाजपचे २०१४ पासून मोठा भाऊ म्हणून सत्तेमध्ये स्वीकारणे शिवसेनेला कठीण झाले. १९९४ ते ९९ या काळात मोठा भाऊ म्हणून मुख्यमंत्रिपद या मिळालेल्या पक्षाला २०१४ च्या भाजप-सेना युती सरकारमध्ये दुय्यम स्थान मिळाल्याची भावना निर्माण झाल्याने पक्षप्रमुखांनी अनपेक्षित व वेगळ्या विचारधारा असणाऱ्या काँग्रेस(Congress)-राष्ट्रवादीबरोबर सत्ता स्थापन करून मुख्यमंत्रिपद मिळवले.

मात्र २०२२ साठी पक्षाच्या पत्रिकेत कुंटुबस्थानातून व रवीच्या अष्टमातून होणारे शनीचे भ्रमण व शनीवरून होणारे मंगळाचे भ्रमण या योगामुळे पक्षात मोठी फूट पडून बहुसंख्य आमदार व मंत्र्यांनी शिवसेनेचा स्वतंत्र गट स्थापन केला. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर सत्तेमध्ये परिवर्तन झाले आणि पक्षाचे दोन गट झाले. विधानसभा निवडणुकीच्या(Vidhansabha Election) वेळी हे दोन्ही गट स्वतंत्रपणे निवडणुका लढविणार असल्याने मित्र पक्षांच्या मदतीने दोन्ही गट सत्ता मिळविण्याच्या प्रयत्नांत आहे. यापैकी एक गट नक्कीच सत्तेमध्ये असणार आहे.

मात्र, कोणता गट सत्तेमध्ये असेल हे पाहण्यासाठी दोन्ही गटाच्या नेतृत्वाच्या पत्रिकेचा विचार करावा लागणार आहे. ते आपण पुढील लेखात निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यावर पाहणार आहोत. सध्या पक्षाच्या पत्रिकेत दशमान ग्रहणे होत असून, गुरूचे भ्रमण प्रतिकूल असल्याने पक्षाच्या दोन्ही गटांना अपेक्षित यश मिळणे कठीण राहील. मात्र, मे २०२५ नंतर मिथुन राशीतील गुरूचे भ्रमण व मूळ शनीवरून होणारे शनीचे भ्रमण लाभदायक राहू शकते. पक्ष पुन्हा एकसंध होतो का ते पहावे लागेल.

Shivsena
Political Horoscope : नशिब बलवान! कुमारी शैलेजा यांना मुख्यमंत्रि‍पदी संधी मिळणार?

भविष्यनामा ५ ते ११ ऑक्टोबर २०२४ -

५ ते ११ ऑक्टोबरदरम्यान चंद्र तूळ ते मकर राशीतून भ्रमण करणार आहे.पुढील काळात शुक्राचे भ्रमण वृश्‍चिक राशीतून होणार आहे. तर मंगळाचे भ्रमण कर्क राशीतून होईल. या काळात ‘ऑक्टोबर हीट’ वाढण्याची शक्यता असून, हवेत मोठी उष्णता वाढेल. स्त्रीवर्गासाठी येणारा काळ प्रतिकूल राहील. स्री अत्याचाराच्या घटना पुढील काळातसुद्धा अनुभवास येतील सोन्या-चांदीच्या वाढणाऱ्या भावाला या काळात लगाम लागण्याची शक्यता असून, शेअरबाजारसुद्धा काही प्रमाणात खाली येण्याची शक्यता राहील.

Shivsena
6th October in History - कर्नाटकातला सत्तेचा 'रोलर कोस्टर'

या काळात मोठे अपघात, आगीच्या दुर्घटना संभवतात. राजकीय क्षेत्रात अनपेक्षित व नाट्यमय घडामोडी या काळात संभवतात. पक्षांतराच्या घटना वाढतील. प्रमुख पक्षांमध्ये फूट पडेल. या आठवड्यात महाराष्ट्र विधानसभा निवडणुका जाहीर होऊन, आचारसंहिता लागू होईल. प्रमुख पक्षांचा प्रचार धुमधडाक्यात चालू होईल. प्रचाराच्या तोफा धडाडतील. मोठ्या नेत्यांचे वाक्‌युद्ध रंगतील. प्रमुख पक्षांच्या उमेदवारी जाहीर होतील. रवी-गुरूच्या नवपंचम योगामुळे नवरात्र-दसरा सण मोठ्या उत्साहात साजरे होतील. बाजारात मोठा उत्साह या काळात दिसेल. नवीन वस्तू खरेदीसाठी उत्साह दिसेल. वाहन, सोने-चांदी खरेदी मोठ्या प्रमाणावर होईल.

Sarkarnama

स्त्री किंवा कलाकारांसाठी हा काळ प्रतिकूल राहील. कलाकार किंवा चित्रपटावरून वादविवाद रंगतील. या काळात सरकारवर मोठे आरोप होतील. प्रमुख व्यक्तींवर भ्रष्टाचाराचे आरोप होतील. पुढील काळात मंगळ-प्लुटो प्रतियोग होत आहे. मोठ्या व्यक्तींवर हल्ले होतील. दोन गटांमध्ये वादविवाद, हाणामारीचे प्रसंग या काळात अनुभवास येतील. खेळाडू, पोलिस, लष्करासाठी हा काळ प्रतिकूल राहील. मोठे अपघात किंवा घातपाताचे प्रसंग या काळात संभवतात.

अशाच माहितीपूर्ण मजकुरासाठी, सखोल विश्लेषणासाठी आवर्जून वाचा 'सरकारनामा' आता साप्ताहिक प्रिंट स्वरुपात- घरपोच अंक मिळण्यासाठी संपर्क : ९८८१५९८८१५

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com