Chandgad Police arrest brother and sister in connection with MLA Shivaji Patil’s honey trap and blackmail case. sarkarnama
महाराष्ट्र

Shivaji Patil Honey Trap : भाजप निकटवर्तीय आमदार हनी ट्रॅप प्रकरणात मोठी अपडेट, बहीण-भावाला अटक

Honey Trap Sister Brother Arrested : आमदार शिवाजीराव पाटील यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करणाऱ्या बहीण भावाला पोलिसांनी अटक केली आहे.

Rahul Gadkar

Shivaji Patil News : चार दिवसांपूर्वी आमदार शिवाजी पाटील यांनी ठाण्यातील मनपाडा पोलिस ठाण्यात त्यांनी हनी ट्रॅपमध्ये अडकवण्यात प्रयत्न होत असल्याची तक्रार दिली होती. त्यांच्या या तक्रारीनंतर एकच खळबळ उडली. दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी चंदगडमधून दोघा बहिण-भावाला अटक केली. अटक केलेल्या मुख्य आरोपीचे नाव मोहन पवार असे आहे. चंदगड विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष आमदार शिवाजी पाटील हे भाजपचे निकटवर्तीय आमदार म्हणून ओळखले जातात. निवडणुकीनंतर त्यांनी भाजपला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना आपला पाठीबा जाहीर केला होता.

विधानसभा निवडणुकीपूर्वी एका महिलेने त्यांना वारंवार मेसेज केले. मैत्रीचा बहाणाकरून त्यांच्याशी चॅटींग करत अश्लील फोटो पाठवत दहा लाख रुपयांची मागणी केली. सातत्याने फोन करून पैसे मागितले तसेच पैसे न दिल्यास बदनामी करण्याची धमकी देखील आमदार पाटील यांना दिली होती. पाटील यांनी महिलेचा नंबर ब्लाॅक केला होता. त्यानंतर त्यांनी दुसऱ्या क्रमांकावरून पुन्हा पाटील यांना त्रास देत पैशाची मागणी केली. वर्षभरापासून पाटील याच्याकडे पैशाची मागणी केली जात होती.

अखेर पाटील यांनी ठाण्यातील चितळसर मानपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारवरून पोलिसांनी संशयीतांना अटक करण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या. मात्र,तक्रारीनंतर मुख्य आरोपी मोहन पवार सरवदे याने थेट आमदार पाटलांचे संपर्क कार्यालय गाठले आणि आपली चूक झाली परत असे करणार नसल्याचे सांगत माफी मागितली. त्यावेळी पोलिसांना बोलावून त्याला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. हनी ट्रॅप प्रकरणात त्याच्या बहीणीचा देखील सहभाग असल्याचे प्रथमदर्शनी स्पष्टपणे दिसत असल्याचे पोलिसांनी तिला देखील अटक केली.

दरम्यान ठाणे पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास सुरू केला अशी माहिती समजतात चंदगड तालुक्यातील आरोपी मोहन प वार याने थेट चंदगड मधील आमदार शिवाजीराव पाटील यांचे कार्यालय गाठले. भीतीने गांगरून गेलेल्या भावाने आपण केलेल्या कृत्याची माहिती कार्यकर्त्यांना दिली. आपण बहिणीच्या मदतीने हे करत असल्याची कबुली त्याने दिले. त्यानंतर चंदगड पोलिसांनी या दोन बहिण भावांना अटक करून ठाणे पोलिसांच्या स्वाधीन केले.

बहीणच मुख्य सुत्रधार?

मांडेदुर्गमधील मोहन आणि शामल या बहिण भावाला अटक करण्यात आली. मात्र, मोहन हा स्वतः होऊन आमदाराच्या संपर्क कार्यालयात गेला त्याने माफी मागितली. मिळालेल्या माहितीनुसार तो मानसिकदृष्ट्या अस्थिर आणि विक्षिप्त असल्याचे प्राथमिक तपास समोर आले आहे. त्यामुळे या गुन्ह्याचा हेतू नेमका काय होता, या गुन्ह्यातील मुख्य सुत्रधार त्याची बहीण आहे का? याचा तपास पोलिस करत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT