Local Body Elections : दिवाळीतच निवडणुकीचे फटाके! पेण नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी भाजपची मजबूत चाल! माजी मंत्र्यांचीही तगडी फिल्डिंग

Pen Municipality Reservation Favors BJP’s Leader : गेल्या दोन- तीन वर्षांपासून प्रलंबित राहिलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. त्यामुळे आता कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहचला आहे.
Pen Municipality And Ravindra Chavan President of the Bharatiya Janata Party
Pen Municipality And Ravindra Chavan President of the Bharatiya Janata Partysarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. राज्यातील प्रलंबित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल अखेर वाजला असून, पेण नगरपालिका नगराध्यक्षपद खुल्या महिला प्रवर्गासाठी राखीव झाले आहे.

  2. भाजप आमदार रवीशेठ पाटील यांच्या पत्नी आणि माजी नगराध्यक्षा प्रितम पाटील यांचा मार्ग या आरक्षणामुळे सुकर झाला आहे.

  3. स्थानिक पातळीवर या निर्णयानंतर नागरिकांमध्ये पुन्हा एकदा प्रितम पाटील यांच्या विजयाबाबत चर्चा सुरू झाली आहे.

Pen News : गेल्या दोन- तीन वर्षांपासून प्रलंबित राहिलेल्या राज्यातील महापालिका, नगरपरिषद, नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता लवकरच होणार आहेत. जिल्हा परिषदांच्या सभापती आणि नगरपरिषद, नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदाचेही आरक्षण जाहीर झाले आहे. त्यामुळे दिवाळीतच निवडणुकीचे फटाके फुटण्यास आता सुरुवात होणार आहे. त्‍याअनुषंगाने राजकीय मंडळींकडून कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात झाल्याचेही चित्र सध्या पाहायला मिळत आहे.

राज्यातील महापालिका, नगर परिषद, नगर पंचायत यांच्या निवडणुकांसह जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच ग्रामपंचायत या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका गेल्या काही वर्षांपासून लांबणीवर पडल्या होत्या. या सर्व ठिकाणी प्रशासन राज होते. ज्याचा फटका विकास कामांना बसला होता.

यामुळे डिसेंबर ते जानेवारी 2026 या कालावधीत राज्यातील रखडलेल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तत्काळ घ्या, असे आदेश सर्वोच्च न्यायालयापाठोपाठ उच्च न्यायालयाने निवडणूक आयुक्तांना दिले. यामुळे आता निवडणुकींचा मार्ग मोकळा झालाा असून निवडणुकीच्या प्रक्रियेला देखील वेग आला आहे.

Pen Municipality And Ravindra Chavan President of the Bharatiya Janata Party
Local Body Election : मोठी बातमी! महाविकास आघाडीला राज ठाकरेंची साथ! शरद पवारांसोबत निवडणूक अधिकाऱ्यांना भेटणार

दरम्यान जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचे आरक्षण तसेच महापालिका, नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष पदाच्या आरक्षणाची सोडत जाहीर करण्यात आली आहे. आता नगरपालिकेच्या प्रभागाचे आरक्षणही पाडण्यात येत आहे. त्यामुळे काही दिवसांवरच येऊन ठेपलेल्या स्थानिकसाठी दिवाळीमध्ये राजकीय फटाके फुटण्यास सुरुवात होणार आहे.

निवडणुकीची प्रक्रिया पाहता राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होत असली तरी प्रत्येक राजकीय पक्ष आपापल्या परीने या निवडणुकीत भूमिका मांडणार आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत कोणता पक्ष बाजी मारतो, हेच पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.

दरम्यान पेण नगरपालिका नगराध्यक्ष पदाचे आरक्षण हे खुला महिला प्रवर्गासाठी पडल्याने माजी नगराध्यक्षा प्रितम पाटील यांचा मार्ग मोकळा झाला आहे. भाजपचे माजी मंत्री तथा आमदार रवीशेठ पाटील यांच्या नेतृत्वाखाली माजी नगराध्यक्षा प्रितम पाटील यांनी पेण शहराच्या विकासाला अधिक प्राधान्य दिले आहे.

त्यांनी या अगोदरच अनेक विकास कामे, नागरिकांच्या प्रश्नांची सोडवणूक, महिलांसाठी विविध योजनांचे लाभ यासह इतरही असंख्य कामे केली आहेत. यामुळे याही निवडणुकीत नगराध्यक्ष पदाकरीता त्यांचा मार्ग सुकर झाल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे.

Pen Municipality And Ravindra Chavan President of the Bharatiya Janata Party
Local Body Elections : बंधू अन् सुनेसाठी दोन आमदारांची कसरत, काँग्रेसच्या गडावर शिवसेनेचा डोळा

FAQs :

प्र.1: पेण नगरपालिका नगराध्यक्ष पदाचे आरक्षण कोणत्या प्रवर्गासाठी झाले आहे?
👉 खुल्या महिला प्रवर्गासाठी हे आरक्षण घोषित झाले आहे.

प्र.2: प्रितम पाटील कोण आहेत?
👉 प्रितम पाटील या भाजप आमदार रवीशेठ पाटील यांच्या पत्नी आणि पेण नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा आहेत.

प्र.3: हे आरक्षण भाजपसाठी किती फायदेशीर ठरेल?
👉 हे आरक्षण प्रितम पाटील यांच्यासारख्या मजबूत महिला नेतृत्वासाठी राजकीयदृष्ट्या अनुकूल ठरू शकते.

प्र.4: स्थानिक स्वराज्य निवडणुका कधी अपेक्षित आहेत?
👉 निवडणुका दिवाळीपूर्वी किंवा त्यानंतर तातडीने जाहीर होण्याची शक्यता आहे.

प्र.5: या निर्णयामुळे स्थानिक राजकारणावर काय परिणाम होईल?
👉 महिला प्रवर्ग आरक्षणामुळे पेणमधील राजकीय समीकरणे बदलण्याची आणि भाजपचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com