MLA Yogesh Kadam Sarkarnama
महाराष्ट्र

Yogesh Kadam On Mahayuti : आमदार योगेश कदमांचा खळबळजनक दावा; आरपीआय, महायुतीबाबत केले मोठं विधान

Political News : शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार योगेश कदमांनी केलेल्या वक्तव्यामुळे महायुतीतील वादाची अप्रत्यक्ष कबुली दिली का ? अशी चर्चा राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात रंगली आहे.

Sachin Waghmare

Mumbai News : विधानसभा निवडणूक तोंडावर असल्याने सर्वच पक्षाने जोरदार तयारी सुरु केली आहे. त्यामुळे सध्या सगळीकडेच लगीनघाई सुरु आहे. त्यातच खेडमधील केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांच्या नागरी सत्कार समारंभाच्या कार्यक्रमात दापोलीचे आमदार योगेश कदम यांनी यापुढे महायुती राहील की नाही याबाबत मी भाष्य करणार नाही. मात्र, आरपीआय आणि शिवसेना नेहमी या मतदारसंघात सोबत राहिल, असं मोठं विधान केले आहे.

शिंदेंच्या शिवसेनेचे (Shivsena) आमदार योगेश कदमांनी (Yogesh kadam) केलेल्या वक्तव्यामुळे महायुतीतील वादाची अप्रत्यक्ष कबुली दिली का ? अशी चर्चा राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात रंगली आहे.

भाजप असेल राष्ट्रवादी असेल आरपीआय असेल महायुतीच्या माध्यमातून सरकार चालवले जात आहे. सरकारमध्ये मी एक आमदार म्हणून काम करत असताना मी अगदी जाहीरपणे सांगतो की, यापुढे महायुती राहील की नाही याबाबत मी भाष्य करणार नाही. मात्र, आरपीआय आणि शिवसेना नेहमी या मतदारसंघात सोबत राहिल, असे योगेश कदम म्हणाले. येत्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्येही ही युती राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आमची आता नाळ जुडलेली आहे. आता ही नाळ कोणी तोडू शकत नाही. शिवाय आम्ही सातत्याने बैठका घेण्यास सुरुवात केलेली आहे. आम्ही एकत्रपणे शिवसेना आणि आरपीआयच्या बैठका घेत आहोत. शिवसेना आणि आरपीआयची युती लोकसभा आणि विधानसभेपुरती मर्यादीत न ठेवता. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्येही ही युती राहिल. मी केंद्रीय मंत्री आठवले यांच्या समोरच शब्द देत असल्याचे त्यांनी सांगितले.

'देईल मी जान, पण बदलू देणार नाही बाबासाहेबाचं संविधान'

हा मेळावा रिपब्लिकन पक्षाचा कार्यकर्त्यांचा मेळावा आहे. हा पक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केला होता. देशातील सर्व जाती धर्मांना एकत्र करण्याचं प्रयत्न केला. अन्याय सहन करत असताना आंबेडकरांसारखा माणूस देशासाठी लढत होता. पँथरचे संघटन मला रिपब्लिकन पक्षासाठी बरखास्त करावे लागले. वेळ आली तर देईल मी जान, पण बदलू देणार नाही बाबासाहेबाचं संविधान, अशी घोषणाही आठवले यांनी यावेळी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT