Richest MLA News : Sarkarnama
महाराष्ट्र

Richest MLA News : कर्नाटकानंतर महाराष्ट्रात सर्वाधिक धनवान आमदार; हजारो कोटी रूपयांची संपत्ती..

Richest MLA in India : राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या आमदारांकडे किती संपत्ती?

सरकारनामा ब्यूरो

Maharashtra News : मागील काही काळात महाराष्ट्रातील आमदारांच्या संपत्तीत दिवसेंदिवस भर पडत असल्याची माहिती पुढे आली आहे. एडीआर संस्थेकडून वतीने २८ राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांतील आमदारांच्या संपत्तीचा अभ्यास करण्यात आला. त्यामध्ये महाराष्ट्रातील आमदारही धनवानांट्या यादीत आघाडीवर असल्याचे पुढे आले आहे.

आमदारांनी निवडणुकीच्या वेळी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रांचा आधार घेऊन हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. कर्नाटकनंतर महाराष्ट्रातील आमदार संपत्तीच्याबाबतीत दुसऱ्या स्थानावर असल्याची माहिती असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्सच्या (एडीआर) कडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालात पुढे आले आहे.

एडीआर संस्थेच्यावतीने देशातील २८ राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांतील आमदारांच्या संपत्तीचा अभ्यास करण्यात आला. यासाठी आमदारांनी निवडणुकीच्या वेळी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रांचा अभ्यास करून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे . एडीआरच्या अहवालात पक्षानुसार संपत्तीचीही माहिती प्रकाशित करण्यात आली आहे. यानुसार, भाजपच्या १,३५६ आमदारांकडे १६ हजार २३४ कोटींची संपत्ती आहे. काँग्रेसच्या ७१९ आमदारांकडे १५ हजार ७९८ कोटींची संपत्ती आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या ६३ आमदारांकडे ९१२ कोटी असून या पक्षाच्या यादीत त्यांचा नवव्या क्रमांक आहे.

राज्यानुसार अभ्यास केला असता कर्नाटक राज्यातील २२३ आमदारांकडे १४ हजार ३५९ कोटींची संपत्ती आहे. यानंतर महाराष्ट्रातील २८४ आमदारांकडे ६ हजार ६७९ कोटींची संपत्ती आहे. या अभ्यासासाठी कर्नाटकातील २०२३ मधील विधानसभा निवडणुकीचा तर महाराष्ट्रासाठी २०१९च्या राज्य निवडणुकीचा आधार घेण्यात आला आहे.

यामुळे महाराष्ट्रातील आमदारांच्या संपत्तीत आणखी वाढ झाली असल्याची शक्यता आहे. आमदाराच्या सरासरी संपत्तीकडे बघितले तर महाराष्ट्रातील प्रत्येक आमदाराकडे सरासरी २३ कोटी ५१ लाखांची संपत्ती आहे. अहवालातील माहितीनुसार, ९० कोटी संपत्तीसह त्रिपुरा राज्यातील ५९ आमदार सर्वात खालच्या क्रमांकावर असल्याचे समजते .

या अभ्यासानुसार कर्नाटकातील २२३ आमदारांकडे १४ हजार ३५९ कोटी, महाराष्ट्रातील २८४ आमदारांकडे ६ हजार ६७९ कोटी, आंध्र प्रदेशमधील १७४ आमदारांकडे ४ हजार ९१४ कोटी, उत्तर प्रदेशातील ४०३ आमदारांकडे ३ हजार २५५ कोटी, गुजरातमधील आमदारांकडे १८२- २ हजार ९८७ कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे पुढे आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT