Naresh Mhaske: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या खासदारफुटीच्या प्रकरणानं सध्या राज्यातील वातावरण चांगलंच तापलेलं आहे. त्यात आता शिंदेसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी खळबळजनक दावा केला आहे. अंबादास दानवे यांच्या विधानपरिषद उमेदवारीला छत्रपती संभाजी नगरातील पदाधिकाऱ्यांचाच विरोध होता असा दावा त्यांनी केला आहे. दिल्लीत पत्रकारांशी बोलताना त्यांनी संजय राऊत यांना प्रतिआव्हान देताना हा खुलासा केला आहे.
उद्धव ठाकरे आमचे प्रश्न मांडण्यासाठी आम्हाला भेटीसाठी वेळ देत नव्हते असा आरोप बंडखोर खासदारांनी केला असल्याचं सांगितलं जात आहे. या प्रश्नावर नरेश म्हस्के म्हणाले, "हे सत्य आहे, कित्येक खासदारांनी संजय राऊतांना सांगितलं तसंच अरविंद सावंताना सांगितलं की, तुम्ही आमची उद्धव ठाकरेंशी भेट घालून द्या. पण खासदारांना ही भेट घालून दिली जात नव्हती. तुम्हाला आत्ताची मराठवाड्यातलं उदाहरण सांगतो की, मराठवाड्यात विधानपरिषदेच्या दरम्यान सगळ्या पदाधिकाऱ्यांचा विधानपरिषदेसाठी जी जागा दिली त्याला विरोध होता. पण त्यांचीही उद्धव ठाकरेंसोबत भेट घालून दिली नाही. विधानपरिषदेचा फॉर्म भरण्यासाठी १० आमदारांच्या सह्यांची गरज असते, आमदारांनी सह्या करण्यासाठी नकार दिला होता.
शेवटी पुण्यामध्ये फॉर्म नेला पुण्याची बैठक आहे म्हणून सांगितलं आणि पुण्यातल्या आमदारांची सही घेतली, एवढी खदखद अंबादास दानवेंच्या अर्जावर १० आमदार सह्या करायला तयार नाहीत. मी हे सत्य या ठिकाणी बोलतोय, गौप्यस्फोट करतो आहे. भास्कर जाधवांनी देखील यासाठी नकार दिला होता शेवटी पुण्याची बैठकीच्या नावावर सह्या घेतल्या गेल्या. ही परिस्थिती आहे यांची. त्यामुळं हे काय भाषा करत आहेत, अशा शब्दांत मस्के यांनी संजय राऊतांवर पलटवार केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.