Mahayuti leaders during discussions over seat sharing for the Maharashtra Legislative Council local body constituency elections. Sarkarnama
महाराष्ट्र

MLC Election : भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीत विधानपरिषदेचा फॉर्म्युला फायनल; कोणता पक्ष-कोणती जागा, कोण उमेदवार सगळं ठरलं

MLC Election : महाराष्ट्र विधानपरिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीपूर्वी महायुतीतील जागावाटपाचा तिढा सुटला आहे.

Hrishikesh Nalagune

MLC Election : विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या 17 जागाच्या निवडणुकीसाठी सोमवारी (1 जून) अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे. त्यापूर्वीच महायुतीमधील जागावाटप अंतिम झाले असल्याची माहिती आहे. महायुतीत भाजपच्या वाट्याला सर्वाधिक 11 जागा आल्या असल्याची माहिती आहे. शिवसेना 4 जागांवर आणि राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागांवर निवडणूक लढवणार असल्याचे निश्चित झाले आहे.

महायुतीमधील जागावाटपाचा तिढा सोडवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ज्येष्ठ नेत्या सुनेत्रा पवार यांनी तब्बल दोन ते तीन दिवस दिल्लीत तळ ठोकला होता. या दिल्ली दौऱ्यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे वरिष्ठ नेत्यांशी मॅरेथॉन चर्चा करून जागावाटपाचा अंतिम फॉर्म्युला फायनल केला आहे.

कोणत्या पक्षाला कोणती जागा आणि तिथे संभाव्य उमेदवार कोण असतील, याचा संपूर्ण आराखडा समोर आला आहे.

भाजपचा फॉर्म्युला: ११ जागा आणि संभाव्य शिलेदार

महायुतीमध्ये मोठा भाऊ ठरलेल्या भाजपने आपल्या कोट्यातील ११ जागांवर तगड्या उमेदवारांना मैदानात उतरवण्याची तयारी केली आहे.

  • वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली: अरुण लखाणी/दादाराव केचे

  • भंडारा-गोंदिया: प्रकाश बाळबुधे

  • नागपूर (पोटनिवडणूक): डॉ. राजीव पोतदार

  • अमरावती: प्रवीण पोटे पाटील

  • नांदेड: अमरनाथ राजूरकर

  • छत्रपती संभाजीनगर-जालना: कैलास गौरंट्याल किंवा किशोर शितोळे

  • धाराशिव-लातूर: बसवराज पाटील

  • जळगाव: केतकी पाटील किंवा नंदू आडवाणी

  • सोलापूर: प्रशांत परिचारक

  • सातारा-सांगली: धैर्यशील कदम/सम्राट महाडिक

  • अहिल्यानगर: प्राजक्त तनपुरे

शिवसेना : ४ जागांवर लढणार

शिवसेनेने आपल्या पारंपारिक आणि ताकद असलेल्या ४ महत्त्वाच्या जागा आपल्याकडे राखण्यात यश मिळवले आहे.

  • ठाणे: रवींद्र फाटक

  • नाशिक: नरेंद्र दराडे

  • परभणी-हिंगोली: अभिमन्यू खोतकर किंवा विप्लव बाजोरिया

  • यवतमाळ: किरण पांडव

राष्ट्रवादी काँग्रेस : २ जागा

राष्ट्रवादी काँग्रेसकडे सध्या दोन जागा आल्या असून, कोकणातील विद्यमान जागेवर पक्ष आपली पकड कायम ठेवणार आहे.

  • कोकण (रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग): अनिकेत तटकरे

  • पुणे: (नाव अद्याप प्रलंबित)

स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील जागांवरून महायुतीच्या तिन्ही पक्षांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू होती. काही मतदारसंघांवर एकापेक्षा जास्त पक्षांनी दावा ठोकल्याने पेच निर्माण झाला होता. हा तिढा सोडवण्यासाठी अखेर मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत दाखल झाले होते.

भाजप हायकमांडच्या थेट हस्तक्षेपानंतर आणि अमित शाह यांच्यासोबत झालेल्या अंतिम बैठकीत या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. आता हा प्राथमिक फॉर्म्युला आणि उमेदवारांचा अंदाज समोर आल्यामुळे, महायुती अधिकृतपणे कधी घोषणा करते आणि यावर महाविकास आघाडी काय रणनीती आखते, याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT