Nashik MLC Election : गिरीश महाजनांपुढे इकडे आड तिकडे विहीर; नाशिक विधानपरिषदेच्या जागेवरुन दोन कट्टर समर्थक आमने-सामने

Nashik MLC Election, Girish Mahajan : संकटमोचक म्हणून ओळख असलेल्या मंत्री गिरीश महाजन यांच्यापुढे मोठा पेच निर्माण झाला आहे. त्यांचे दोन कट्टर समर्थक गणेश गिते व नीलेश बोरा दोघांनी नाशिकच्या जागेसाठी अर्ज घेतले आहेत.
Girish Mahajan
Girish MahajanSarkarnama
Published on
Updated on

Nashik MLC Election : नाशिक विधानपरिषदेच्या जागेवरून एकीकडे महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या भाजप व शिवसेनेत जोरदार रस्सीखेच सुरू आहे. दोन्ही पक्षांनी नाशिकवर दावा सांगितल्याने तिढा वाढला आहे. दोन्ही जागांमधील पेच अद्याप पक्षश्रेष्ठींना देखील सोडवता आलेला नाही. जागावाटपाचा निर्णय प्रलंबित असताना आता भाजपमधील इच्छुकांमध्येच अंतर्गत चुरस वाढल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

भाजपचे संकटमोचक असलेल्या मंत्री गिरीश महाजन यांचेच दोन अत्यंत निकटवर्तीय आणि कट्टर समर्थक नाशिकच्या जागेसाठी थेट आमनेसामने उभे ठाकले आहेत. यामुळे गिरीश महाजन यांच्यासमोर इकडे-आड तिकडे विहीर अशी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

भारतीय जनता पक्षाचे नाशिक शहर उपाध्यक्ष निलेश बोरा आणि नाशिक महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती गणेश गीते दोघांनी विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी शड्डु ठोकला आहे. बोरा आणि गीते या दोघांनीही विधानपरिषदेच्या जागेसाठी भाजपकडून उमेदवारी अर्ज खरेदी केले आहेत. त्यामुळे या दोन मित्रांमध्येच आता नाशिकच्या जागेवरुन संघर्ष सुरु झाल्याने मंत्री गिरीश महाजन यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. दोघांमधील मैत्री कायम ठेवण्याची कसरत महाजन यांना करावी लागणार आहे.

Girish Mahajan
MLC Election : नाशिकमध्ये गिरीश महाजनांचे खंदे समर्थक आज अर्ज घेणार, शिवसेनेच्या नरेंद्र दराडेंची कोंडी

नाशिक महानगपालिकेत भाजपची सत्ता आहे. पालिका निवडणुकीत निलेश बोरा यांनी महत्वाची भूमिका निभावली होती. तर दुसरीकडे, गणेश गीते हे नाशिक महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती राहिले आहेत. महापौर पदाच्या शर्यतीत त्यांच्या पत्नी दीपाली गिते यांचे नाव आघाडीवर होते. गणेश गिते यांची महाजन यांचे खंदे समर्थक म्हणून ओळख आहे. दोघेही गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय असून आमनेसामने आल्याने संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे महाजन या अंतर्गत वादावर कसा आणि काय तोडगा काढतात? हे पाहावे लागणार आहे.

Girish Mahajan
MLC Election : नाशिकसाठी भाजपची वेगळी खेळी ; शिवसेनेला महामंडळाचे उपाध्यक्षपद देऊन जागा सोडवणार?

विशेष म्हणजे, राजकीय स्पर्धेत एकमेकांच्या आमने-सामने असले तरी गणेश गिते व नीलेश बोरा यांच्यात वैयक्तिक पातळीवर असलेल्या मैत्रीमुळे एकाला वेळीच माघार घ्यावी लागेल असे बोलले जात आहे. परंतु यासर्वात मंत्री महाजन यांची भूमिका महत्वाची असणार आहे.

गिते की बोरा यामध्ये मंत्री गिरीश महाजन कुणाला कौल देता याकडे नाशिकच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे. परंतु दोघेही गिरीश महाजन यांचे कट्टर समर्थक असल्याने हा पेच सोडवणं महाजन यांना जरा अवघड जाईल असं दिसतंय.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com