MLC Election Result: महाराष्ट्रातील द्वैवार्षिक शिक्षक-पदवीधर निवडणुकीचा आज निकाल जाहीर होणार आहे. महाराष्ट्रात पाच जागांसाठी शुक्रवारी २३ ऑक्टोबरला मतदान पार पडलं होतं. या निवडणुकीत विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांसह काही अपक्ष उमेदवार देखील आपलं नशिब आजमावणार आहेत. एकूण १८२ उमेदवार यंदा निवडणुकीच्या रिंगणात होते. पुणे, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर पदवीधरसाठी आणि पुणे, अमरावती शिक्षकसाठी ही निवडणूक पार पाडली.
राज्यातील पाच शिक्षक-पदवीधर जागांसाठी आज, २७ ऑक्टोबरला सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. या निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशिन्सचा वापर नसल्यानं मतमोजणी देखील यंत्राद्वारे होणार नाही. तर सर्वसाधारण मतपत्रिका मोजणीद्वारे ही मतमोजणी पार पडणार आहे. त्यामुळं ईव्हीएमवर होणाऱ्या मतमोजणीपेक्षा या मतमोजणीला वेळ लागणार आहे. खरंतर आज महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, बिहार, कर्नाटकातल्या विधान परिषद निवडणुकीचे निकाल जाहीर होणार आहेत. या सर्वच राज्यांमध्ये सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे.
राज्यात विरोधीक्षांपैकी काँग्रेस नागपूर पदवीधर आणि पुणे शिक्षक मतदारसंघासाठी निवडणूक लढवत आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पुणे आणि छत्रपती संभाजीनगर पदवीधरची निवडणूक लढवत आहे. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे अमरावती शिक्षकची जागा लढवत आहेत. तर सत्ताधारी पक्षाकडून नागपूर, पुणे पदवीधर आणि पुणे शिक्षकसाठी भाजपनं उमेदवार दिले आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस छत्रपती संभाजीनगर पदवीधरसाठी निवडणूक लढवत आहे. शिवसेना अमरावती शिक्षक मतदारसंघातून आपला उमेदवार उतरवला आहे.
१) पुणे विभाग पदवीधर मतदारसंघ (एकूण ४७ उमेदवार)
डॉ. स्मिता योगेश जाधव (भाजप)
हर्षदा देशमुख-जाधव (राष्ट्रवादी काँग्रेस -शप)
सुनील मोदी-शिवसेना (शिवसेना युबीटी)
२) पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ (एकूण ३० उमेदवार)
कौस्तुभ मुरलीधर गावडे (भाजप)
जयंत दिनकर आसगावकर (काँग्रेस)
सचिन सानप – अपक्ष (शिंदेसेनेचा पाठिंबा)
दत्तात्रय सावंत – अपक्ष
३) नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघ (एकूण ३८ उमेदवार)
सुधाकर विठ्ठलराव कोहळे (भाजप)
अभिजीत गोविंदराव वंजारी (काँग्रेस)
नितेश कराळे (अपक्ष) एनसीपी शप पाठींबा
४) छत्रपती संभाजीनगर विभाग पदवीधर मतदारसंघ (एकूण ४१ उमेदवार)
सतीश भानुदास चव्हाण (राष्ट्रवादी काँग्रेस)
प्रतापसिंह पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस शप)
दिलीप हरिभाऊ घुगे (शिवसेना युबीटी)
५) अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ (एकूण २६ उमेदवार)
किरण रामराव सरनाईक (शिवसेना)
अदिती ऋषिकेश पोहरे (काँग्रेस)
दत्तात्रय लहाने (शिवसेना युबीटी)
दिलीप कडू (विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ)
श्रीकांत देशपांडे, शेखर भोयर, संगीता शिंदे, सुमित पवार इ. (अपक्ष)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.