Marathwada Graduate Constituency Election: मराठवाडा पदवीधरच्या मतमोजणीसाठी पाचशे अधिकारी-कर्मचारी; निकालाला दुसरा दिवस उजाडणार..?

Marathwada Graduate MLC Result: मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या या निवडणुकीत ४१ उमेदवार असल्यामुळे मतपत्रिकांवरील पसंतीक्रम तपासणे आणि आवश्यक असल्यास मतांचे हस्तांतरण करणे यासाठी वेळ लागू शकतो.
Marathwada graduate Election
Marathwada graduate Election Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Chhatrapati Sambhajinagar : मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचा आमदार कोण होणार? याची प्रतिक्षा आता चोवीस तासानंतर संपणार आहे. मंगळवारी (ता.२७ ऑक्टोबर) होणाऱ्या मतमोजणीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. महायुतीचे सतीश चव्हाण विजयाचा चौकार मारणार, की मग पदवीधरांनी नवा चेहरा निवडला आहे? हे उद्या, रात्री उशीरापर्यंत स्पष्ट होणार आहे. मतमोजणीसाठी तब्बल पाचशे अधिकारी-कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.

छत्रपती संभाजीनगर पदवीधरच्या निवडणुकीत वैध आणि अवैध मतपत्रिका वेगळ्या करणे, पहिल्या पसंतीची मते मोजून वैध मतांच्या आधारे विजयाचा कोटा निश्चित करणे, एखाद्या उमेदवाराला पहिल्याच पसंतीत कोटा मिळाल्यास त्याला विजयी घोषित करण्याची प्रक्रिया किंवा कोणालाही कोटा न मिळाल्यास लागू असलेल्या नियमांनुसार पुढील पसंतींच्या मतांचे हस्तांतरण या प्रक्रियेला बराच वेळ लागणार आहे. त्यामुळे अंतिम निकाल जाहीर होण्यासाठी २८ ऑक्टोबरचा दिवस उजाडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या या निवडणुकीत ४१ उमेदवार असल्यामुळे मतपत्रिकांवरील पसंतीक्रम तपासणे आणि आवश्यक असल्यास मतांचे हस्तांतरण करणे यासाठी वेळ लागू शकतो. पहिल्या पसंतीतच कोटा पूर्ण झाला नाही, तर मतमोजणी लांबण्याची शक्यता आहे. उद्या सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरूवात होणार आहे. मतमोजणी प्रक्रिया अचूक, पारदर्शक, निष्पक्ष व शांततेत पार पाडण्यासाठी नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परस्पर समन्वयाने जबाबदारी पार पाडावी, असे निर्देश निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी दिले आहेत.

मतमोजणी प्रक्रिया अचूक, पारदर्शक, निष्पक्ष व शांततेत पार पाडण्यासाठी नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परस्पर समन्वयाने जबाबदारी पार पाडावी, असे निर्देश निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी दिले आहेत.

Marathwada graduate Election
Om RajeNimbalkar News: शिंदेंचा खासदार सरकारवरच नाराज..? विरोधकांनी पेटवलेल्या मुद्द्यावर शिवसेनेच्या ओम राजेंनी घेतली धाडसी भूमिका

छत्रपती संभाजीनगर येथील चिकलठाणा एमआयडीसी परिसरातील रेसोनेट लॉजिस्टिक्स एलएलपी येथे मतमोजणी होणार आहे. विभागीय आयुक्त श्रीकांत यांनी आज मतमोजणी केंद्राला भेट देऊन पूर्वतयारीचा आढावा घेतला.

यावेळी त्यांनी मतमोजणी कक्षातील टेबलांची मांडणी, स्ट्राँग रूम, मतपेट्यांची सुरक्षितता, अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती, मतमोजणीच्या फेऱ्या, निकाल संकलन व सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केली.

Marathwada graduate Election
Tamilnadu Politics: मुख्यमंत्री विजय यांचा 'डीएमके'ला मोठा दणका; स्टॅलिन सरकारमधील माजी शिक्षणमंत्र्यांना ठोकल्या बेड्या; 100 कोटी वसुली प्रकरण...

मतमोजणीसाठी ७० टेबलांची व्यवस्था करण्यात आली असून, प्राथमिक मतमोजणीच्या १३ फेऱ्यांचे नियोजन आहे. प्रत्येक टेबलवर एक पर्यवेक्षक व दोन सहाय्यक नियुक्त करण्यात आले आहेत. प्रत्येक सात टेबलांवर एका सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे नियंत्रण राहणार आहे.

टपाली मतपत्रिकांच्या मोजणीसाठी स्वतंत्र दोन टेबलांची व्यवस्था करण्यात आली आहे. मतपत्रिकांचे वर्गीकरण, वैध व अवैध मतांचा निर्णय, पसंतीक्रमानुसार मतांची नोंद तसेच निकालपत्रकांची पडताळणी करताना विशेष दक्षता घ्यावी.

मतमोजणीदरम्यान कोणतीही शंका अथवा अडचण उद्भवल्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली नियमानुसार कार्यवाही करावी, अशा सूचना विभागीय आयुक्तांनी दिल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com