Vidhan Bhavan Mumbai, Maharashtra Political Crisis  Sarkarnama
महाराष्ट्र

MLC Election Results: निकाल जाहीर होण्याआधीच उमरग्यात झळकले भाजपच्या विजयाचे बॅनर

Dharashiv Latur- Beed MLC: महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीच्या निकालाआधीच उमरग्यात भाजप उमेदवार बसवराज पाटील यांच्या विजयाचे बॅनर झळकल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

Mangesh Mahale

MLC Election Results News: महाराष्ट्र विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज मतमोजणीला सुरवात होत आहे. महायुती आणि महाविकास आघाडीसाठी हे निकाल निर्णायक ठरणार आहेत. उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. लवकरच विजयी उमेदवारांची नावे आणि राजकीय समिकरणे स्पष्ट होतील.

धाराशिवमध्ये निकाल जाहीर होण्याआधीच भाजपच्या विजयाचे बॅनर झळकल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. निकालापूर्वीच विजयाचा आत्मविश्वास दाखवणाऱ्या या बॅनर्समुळे स्थानिक राजकारण तापलं आहे. भाजपकडून मोठ्या विजयाची अपेक्षा व्यक्त होत असल्याचं चित्र आहे.

या बॅनर्समागचा राजकीय संदेश काय, निवडणुकीच्या निकालावर याचा काही परिणाम होणार का आणि धाराशिवमधील लढतीत नेमकी कोणाची बाजू मजबूत मानली जात आहे. धाराशिव-लातूर-बीड मतदार संघात बसवराज पाटील (भाजप) विरुद्ध महेश देशमुख (काँग्रेस) यांच्यात प्रमुख लढत आहे. याठिकाणी 99.49 टक्के मतदान झाले आहे.

विधान परिषद निवडणुकीमध्ये महायुती (भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी) आणि महाविकास आघाडी (काँग्रेस, ठाकरे गट, शरद पवार गट) या दोन्ही बाजूंनी ताकद पणाला लावली होती. मात्र, महायुतीचे पारडे जड असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

कोणते उमेदवार बिनविरोध विजयी?

पुणे - विक्रम काकडे - राष्ट्रवादी काँग्रेस

वर्धा - गडचिरोली - चंद्रपूर - अरुण लखाणी - भाजप

अहिल्यानगर - प्राजक्त तनपुरे - भाजप

ठाणे - रवींद्र फाटक - शिवसेना

यवतमाळ - दुष्यंत चतुर्वेदी - शिवसेना

रायगड - रत्नागिरी - सिंधुदुर्ग - अनिकेत तटकरे - राष्ट्रवादी काँग्रेस

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT