Raj Thackeray & Devendra Fadnavis. Sarkarnama
महाराष्ट्र

Raj Thackeray News : राज ठाकरेंची CM फडणवीसांच्याबाबत भूमिक ठरली! जाहीर सभेत सांगितलं, 'आमचा पाठींबा...'

Raj Thackeray On CM Devendra Fadnavis : ऑक्टोबर नोव्हेंबरला बहुदा निवडणुका होतील. पण यांची गॅरंटी नाही.त्यामुळे ज्यावेळी निवडणुका लागतील तोपर्यंत तुमची सगळी बांधणी पूर्ण झाली असली पाहिजे, असे राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना आवाहन केले.

Roshan More

Raj Thackeray News : मनसेच्या गुढीपाडव्याच्या जाहीर सभेत राज ठाकरेंनी आपली भूमिका मांडली. औरंगजेबाच्या कबरीपासून ते महाराष्ट्रातील जातीवादावर टोलेबाजी करणारे राज ठाकरे आगामी महापालिकेच्या दृष्टिने कोणती भूमिका घेतात याकडे मनसे सैनिकांचे लक्ष लागून राहिले होते.आपण महायुती की महाविकास आघाडीसोबत जाणार हे ठाकरेंनी स्पष्ट केले नाही. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांबाबतची भूमिका त्यांनी जाहीर केली.

राज ठाकरे म्हणाले, 'मराठी माणसाच्या चांगल्यासाठी काम करणार असतील तर फडणवीसांना आमचा पाठींबा असेल. निवडणुका संपल्या, शिमगा संपला. फडणवीसांच्या हाती सुसंस्कृत राज्य आलं आहे. चांगला कामाला आमचा निश्चित पाठींबा असेल पण प्रत्येक गोष्ट आमचं ऐकुन करा.'

लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी उमेदवार उभे न करता पंतप्रधान नरेंद्र मोदींना जाहीर पाठींबा देत महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार केला होता. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांना पाठींब्याची भाषा करत महापालिका निवडणुकीला राज ठाकरे काय भूमिका घेणार याची देखील उत्सुकता मनसे पदाधिकाऱ्यांमध्ये आहे.

'ऑक्टोबर नोव्हेंबरला बहुदा निवडणुका होतील. पण यांची गॅरंटी नाही. कारण यांच चाललंय ते बरं चाललंय. हे एक माणूस धरुण बसलेत आयुक्त. त्यामुळे ज्यावेळी निवडणुका लागतील तोपर्यंत तुमची सगळी बांधणी पूर्ण झाली असली पाहिजे. तुम्ही सगळे जण जोरात कामाला लागले पाहिजे.', असा सूचना देखील मनसे कार्यकर्ते, पदाधिकाऱ्याना राज ठाकरे यांनी केल्या.

मराठा आरक्षण का मागताय?

राज ठाकरे म्हणाले, संयुक्त महाराष्ट्र झाल्यापासून सर्वाधिक मराठा मंत्री, मराठा आमदार निवडून आले आहेत. मराठा मुख्यमंत्री होते तरी देखील माझ्या मराठा समाजाला आरक्षण मागावं लागत आहे. तुम्ही येवढ्या वर्ष काय केलं?

औरंगजेबाची कबर हटवू नका

राज ठाकरे यांनी औरंगजेबाची कबर हटवू नये, असे म्हटले. ते म्हणाले, सजलेली कबर काढून टाका. कबर फक्त दिसली पाहिजे. आणि तेथे बोर्ड लावा मराठ्यांना संपवण्यासाठी आलेल्या औरंगजेबाला येथेच गाडला.हाच आमचा इतिहास आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT