Vijay Wadettiwar : 'छत्रपती संभाजी महाराजांचा खून झाला अन् आम्ही गुढी बिडी...', विजय वडेट्टीवारांचे वादग्रस्त वक्तव्य

Vijay Wadettiwar Controversial Statement On Gudi Padwa : गुढीपाडवा म्हणजे मराठी नवीनवर्ष याबद्दल बोलताना देखील वडेट्टीवार यांनी मराठी नववर्ष फक्त मराष्ट्रातच आहे का? इतर राज्यात का नाही? असा सवाल देखील उपस्थित केला.
Vijay Wadettiwar
Vijay Wadettiwarsarkarnama
Published on
Updated on

Vijay Wadettiwar News : महाराष्ट्रात रविवारी गुढीपाडवा मोठा उत्सवात साजरा करण्यात आला. राजकीय नेत्यांनी देखील गुढी उभारत आपले फोटो सोशल मीडियातून शेअर केले. मात्र, त्याच दिवशी काँग्रेसचे विधीमंडळ नेते, माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

चंद्रपूरला आयोजित कुस्ती स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभात बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले, 'मी गुढी-बिढी काही उभारत नाही, छत्रपती संभाजी महाराजांचा खून झाला त्याचा हा दुसरा दिवस आहे, आम्ही काय आनंदाची गुढी उभारावी? आम्ही या भानगडीत पडत नाही.'

गुढीपाडवा म्हणजे मराठी नवीनवर्ष याबद्दल बोलताना देखील वडेट्टीवार यांनी मराठी नववर्ष फक्त मराष्ट्रातच आहे का? इतर राज्यात का नाही? असा सवाल देखील उपस्थित केला. जाहीर कार्यक्रमातून गुढीपाडव्यावर वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या वडेट्टीवाारंनी आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून मात्र मराठी नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

आपल्या शुभेच्छामध्ये त्यांनी म्हटले आहे की, गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! गुढी उभारू आनंदाची, आरोग्याची, समाधानाची आणि उत्तुंग यशाची! नवीन वर्ष तुमच्या जीवनात सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्य घेऊन येवो.

वडेट्टीवारांच्या निशाण्यावर सरकार

कुणाल कामरा प्रकरणात विजय वडेट्टीवार यांनी सरकारच्या भूमिकेवार टीका केली होती. एकीकडे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर व्यंगात्मक गाणं म्हटलं म्हणून कुणाल कामराला टायर मध्ये टाकून मारण्याची धमकी महायुतीचे मंत्री देतात. तर दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या कोरटकर ला सुरक्षा पुरवतात. खरंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या महायुतीच्या लाडक्या प्रशांत कोरटकर ला औरंगजेबाच्या शेजारी कबर खोदून त्याच्यावर माती टाकली पाहिजे, असे वडेट्टीवार म्हटले होते.

हिंदुत्वावाद्यांच्या भूमिकेकडे लक्ष

विजय वडेट्टीवार यांनी गुढीपाडव्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याने त्यांना महायुतीमधील मंत्री नितेश राणे काय उत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मागील काही काळांपासून आक्रमक भूमिका घेणाऱ्या हिंदुत्त्वादी संघटना देखील वडेट्टीवारांना काय उत्तर देणार याची देखील चर्चा सुरू आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com